बुलडाणा : येथील लोकसभा मतदारसंघातील डोणगावच्या १२० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात येणार आहे. राज्याचे उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्राआधारे हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या केंद्रावर १८ एप्रिल रोयी मतदान पथकाकडून मॉकपोल केल्यानंतर कंट्रोल युनीटमधील डेटा क्लिअर न केल्याने वाद झाला होता. काही मतदान झाल्यावर ही बाब लक्षात आल्याने या केंद्रावर फेरमतदान घेण्यात येत असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी सांगितले.
डोणगावमध्ये २४ला फेरमतदान
येथील लोकसभा मतदारसंघातील डोणगावच्या १२० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात येणार आहे...
MT 22 Apr 2019, 4:00 am