नागपूर : बेलतरोडीतील सतरावर्षीय विद्यार्थिनी मानसी अशोक जोनवाल ही ब्ल्यू व्हेलचा बळी असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे. अद्याप पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पंचनाम्यादरम्यान मानसीच्या हातावर 'कट हिअर टू एक्झिट' असे गोंदवून आहे तसेत टॅट्यू काढलेले आहेत. तिचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. अंगठ्याच्या ठशाने तो उघडतो. मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आला आहे. तिने ब्ल्यू व्हेल गेममुळे आत्महत्या केली किंवा नाही, हे अहवालानंतरच स्पष्ट होईल. मानसी ही नरेंद्रनगरमधील साईकृपा सोसायटी येथे राहात होती. तिचे वडील अशोक हे वायुसेनेचे निवृत्त अधिकारी असून आई शिक्षिका आहे. नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्याने ती तणावात होती. घरीच राहात होती. सहा महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांनी तिला मोबाइल घेऊन दिला होता. ती तासंतास मोबाइलवर खेळत होती, असेही पोलिसांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी मानसीने तिच्या खोलीत पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
विद्यार्थिनी ठरली ‘ब्ल्यू व्हेल’चा बळी?
बेलतरोडीतील सतरावर्षीय विद्यार्थिनी मानसी अशोक जोनवाल ही ब्ल्यू व्हेलचा बळी असल्याची धक्कादाक माहिती समोर आली आहे...
Maharashtra Times 7 Dec 2018, 11:32 am