अ‍ॅपशहर

गोंदियात केंद्रीय विद्यालय

केंद्र सरकारच्या मानव संशाधन व मनुष्यबळ मंत्रालयाच्यावतीने देशातील १५० जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय मंजूर करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचाही समावेश आहे. या केंद्रीय विद्यालयात शासकीय नोकरदारापासून ते सर्वसामान्यांच्या मुलांना प्रवेश मिळणार आहे. भंडारा येथील जवाहरनगर स्थित केंद्रीय विद्यालयाचे प्रशासन कार्यान्वित झाले असून गोंदिया येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी १० एकर जागेचा शोध सुरू झाला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात नक्षलग्रस्त, आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यासाठी हे विद्यालय सेमीअर्बन म्हणून मंजूर झाले आहे.

Maharashtra Times 20 Jan 2017, 4:00 am
खेमेंद्र कटरे, गोंदिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gondia kendriya vidyalaya in gondia
गोंदियात केंद्रीय विद्यालय

केंद्र सरकारच्या मानव संशाधन व मनुष्यबळ मंत्रालयाच्यावतीने देशातील १५० जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय मंजूर करण्यात आले असून यात महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याचाही समावेश आहे. या केंद्रीय विद्यालयात शासकीय नोकरदारापासून ते सर्वसामान्यांच्या मुलांना प्रवेश मिळणार आहे. भंडारा येथील जवाहरनगर स्थित केंद्रीय विद्यालयाचे प्रशासन कार्यान्वित झाले असून गोंदिया येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी १० एकर जागेचा शोध सुरू झाला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात नक्षलग्रस्त, आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यासाठी हे विद्यालय सेमीअर्बन म्हणून मंजूर झाले आहे.

आजघडीला देशातील १५० जिल्ह्यांमध्ये केंद्रीय विद्यालय नव्हते, अशा ठिकाणी हे विद्यालय मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये गोंदियाचा समावेशसुद्धा आहे. आधीपासूनच नवेगावबांध येथे केंद्रसरकारच्या अंतर्गत असलेले नवोदय विद्यालय सुरू आहे. त्यातच आता नवे केंद्रीय विद्यालय मिळाल्याने खेड्यापाड्यातीलच नव्हे तर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना महागड्या सीबीएसईच्या शांळाऐवजी शासनाच्याच शाळेतून कमी पैशात सीबीएसईचे शिक्षण उपलब्ध होणार आहे.

गोंदिया येथे हे केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी भंडारा येथील जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानुसार जवाहरनगर केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य महिपाल आणि त्यांच्या चमूने गुरुवारी गोंदिया येथे येऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन केंद्रिय विद्यालय सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. तसेच विद्यालयासाठी गोंदिया शहर परिसरात सुमारे १० एकर जागा हवी असल्याची माहिती दिली.

सुसज्ज व्यायामशाळेसोबतच प्रयोगशाळा

नव्याने सुरू होणाऱ्या केंद्रीय विद्यालयामध्ये सर्व विद्यार्थ्यांसांठी सुसज्ज व्यायामशाळा राहणार आहे. सोबतच इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतसाठी एक, सहा ते दहावीपर्यंतसाठी एक आणि अकरावी ते बारावीसाठी एक, अशा तीन स्वतंत्र संगणक प्रयोगशाळा राहणार आहेत. आरटीईमधील प्रवेश घेतलेल्या मुलांना निःशुल्क शिक्षण मिळेल, तर बीपीएलमधील मुलांना नाममात्र प्रवेश शुल्क लागणार आहे.या केंद्रीय विद्यालयासाठी मानव संसाधन व मनुष्यबळ मंत्रालयांतर्गत नोकरभरती करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज