म.टा. प्रतिनिधी, नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी भंडाऱ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, उपायुक्त संजय धिवरे, के.एन.के. राव, शैलेश मेश्राम उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी माल्यार्पण केले. उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.