अ‍ॅपशहर

पत्नीचे दागिने गहाण ठेऊन पेरणी, शेतकऱ्याने बैलांऐवजी स्वतःलाच जुंपले

शेतात पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने रमेशने त्याच्या पत्नीच्या गळ्यातील पोत कानातले सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्यातून फक्त शेतीसाठी बियाणे व खत घेण्यात आले. शेतीत लागवड करण्यासाठी बैलजोडीची गरज असते, मात्र त्याचं भाड देणे होत नसल्याने शेतकरी रमेशने स्वतः काकरी बनवली आणि दिवसभर बैलासारखी ओढून कपाशी लागवडीसाठी शेतात काकर फाडले.

महाराष्ट्र टाइम्स 20 Jun 2020, 2:07 am
वर्धाः शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या अडचणी अद्याप सुटल्या नाहीत. ऐन खरिपाचा हंगाम असताना हाताशी पैसा नाही. आणि जो होता तोही आपल्या कॅन्सरग्रस्त मुलाचा जीव वाचविण्यात घालविला, पण पैसे जीव वाचवू शकले नाही. आता करावं काय? अशा पेचात असणाऱ्या शेतकऱ्याने पत्नीचे दागिने गहाण ठेऊन पेरणी आटोपली. बियाणे आणि खते एवढीच खरेदी गहाण दागिन्यांतून झाल्यावर काकरे फाडण्याच्या कामात मात्र बैलां ऐवजी स्वतःलाच जुंपलेय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शेतकरी रमेश बनसोड


जिल्ह्यातील नारा येथील रमेश बनसोड यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. त्यावर सन 2008 मध्ये पीककर्ज घेतलं, तेव्हापासून परिस्थिती नसल्याने कर्ज फेडू शकले नाही, सरकारने कर्जमाफी केली मात्र त्या कर्जमाफीमध्ये आमची कर्जमाफी झाली नाही त्यामुळे पुन्हा शेतीवर कर्ज मिळालं नाही. अशी आपबिती शेतकरी रमेश यांनी मांडली.

शेतात पेरणी करण्यासाठी पैसे नसल्याने रमेशने त्याच्या पत्नीच्या गळ्यातील पोत कानातले सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्यातून फक्त शेतीसाठी बियाणे व खत घेण्यात आले. शेतीत लागवड करण्यासाठी बैलजोडीची गरज असते, मात्र त्याचं भाड देणे होत नसल्याने शेतकरी रमेशने स्वतः काकरी बनवली आणि दिवसभर बैलासारखी ओढून कपाशी लागवडीसाठी शेतात काकर फाडले. त्यानंतर पत्नी ,पुतणे शेतीच्या कपाशी लागवड करण्यासाठी मदत करू लागले. यातून पैसा खर्च होत नाही मात्र बियाणे व खत यावर पैसे खर्च केला आहे.

अचानक माझ्या मुलाला ब्लड कॅन्सरच्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. तेवढे पैसे त्याच्या आजाराला लावावे लागले. अनेकांनी आर्थिक मदत केली मात्र अक्षयने अखेर जगाचा निरोप घेतला. त्याच्या आजारासाठी अनेकाकडून कर्ज घेतले,आता खरीप हंगामाला सुरुवात झाली शेती पेरणी करायची कशी हा प्रश्न सतावत असताना पत्नीच्या गळ्यातील पोत ,कानातले गहाण ठेवले आता त्यातून मिळालेल्या पैशात शेती करत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज