नागपूर : मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी लक्ष्मीनगर झोनमधील बजाजनगर येथील भरत लालवानी व ललित लालवानी यांनी केलेले अनधिकृत बांधकाम पाडले. मनपातर्फे त्यांना अवैध बांधकाम तोडण्यासाठी १० जुलै रोजी नोटीस बजावली होती. त्यानंतरही बांधकाम न तोडल्याने अखेर मनपाच्या पथकाने बुधवारी या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालविला. लालवानी कुटुंबीयांनी बांधलेल्या घराच्या मागील भागातील पॅराफिट भिंत तसेच बाल्कनी तोडण्यात आली. सहायक आयुक्त अशोक पाटील, प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या मर्गादर्शनाखाली माळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लालवानींचे अवैध बांधकाम पाडले
मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी लक्ष्मीनगर झोनमधील बजाजनगर येथील भरत लालवानी व ललित लालवानी यांनी केलेले अनधिकृत बांधकाम पाडले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2019, 4:00 am