अ‍ॅपशहर

नागपुरात न्यायाधीशांची पावणे तीन लाखांनी फसवणूक; मोबाइल केला हॅक

सोनाली कनकदंडे या न्यायाधीश आहेत. १४ मे रोजी त्यांना फास्ट टॅग रिचार्ज करायचे होते. त्यांनी गुगलवर फास्ट टॅगचे अ‍ॅप सर्च केले. त्यांनी मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करीत फास्ट टॅग रिचार्ज केले. याच दरम्यान सायबर गुन्हेगाराने त्यांचा मोबाइल हॅक केला. त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख ७५ हजार रुपये अन्य खात्यात वळते केले. याबाबत कळताच सोनाली कनकदंडे यांनी सीताबर्डी पोलिसांत तक्रार केली.

Authored byअविनाश महाजन | Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2022, 1:31 am
नागपूर : मोबाइल हॅक करून सायबर गुन्हेगाराने न्यायधीशांच्या बँक खात्यातून दोन लाख ७५ हजार ३९९ रुपयांची रक्कम अन्य खात्यात वळती केली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (in nagpur a judge was cheated of rs 3 lakh)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम in nagpur a judge was cheated of rs 3 lakh
नागपुरात न्यायाधीशांची पावणे तीन लाखांनी फसवणूक; मोबाइल केला हॅक


क्लिक करा आणि वाचा- 'राज्य सरकारमधील जबाबदारांनी राजीनामे द्यावेत', ओबीसी आरक्षणावरून फडणवीस बरसले

सोनाली कनकदंडे (वय ४२, रा.सिव्हिल लाइन्स) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. सोनाली कनकदंडे या न्यायाधीश आहेत. १४ मे रोजी त्यांना फास्ट टॅग रिचार्ज करायचे होते. त्यांनी गुगलवर फास्ट टॅगचे अ‍ॅप सर्च केले. त्यांनी मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करीत फास्ट टॅग रिचार्ज केले. याच दरम्यान सायबर गुन्हेगाराने त्यांचा मोबाइल हॅक केला. त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख ७५ हजार रुपये अन्य खात्यात वळते केले. याबाबत कळताच सोनाली कनकदंडे यांनी सीताबर्डी पोलिसांत तक्रार केली.

क्लिक करा आणि वाचा- 'महाविकास आघाडीचे सरकार ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत गेंड्याच्या कातडीचे'

नागपुरातील सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर गुन्हेगाराचा शोध सुरू केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- मध्यप्रदेशचा निर्णय ४ दिवसात कसा बदलला, नाना पटोलेंचा सवाल; भाजपलाही फटकारलं

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज