नागपूर : पतंग काढताना तोल जाऊन पडल्याने जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना उमरेड मार्गावरील निर्मलनगरी मागे घडली. सादिक शेख गुलाम नबी (वय ३४,रा.अवलियानगर),असे मृताचे नाव आहे. तो खासगी काम करीत होता. बुधवारी सायंकाळी मिलच्या टिनावर अडकलेली पतंग काढताना सादिक खाली पडला. त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून सादिक शेख याला मृत घोषित केले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पतंगने घेतला युवकाचा बळी
पतंग काढताना तोल जाऊन पडल्याने जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला ही घटना उमरेड मार्गावरील निर्मलनगरी मागे घडली सादिक शेख गुलाम नबी (वय ३४,रा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jan 2020, 4:00 am