अ‍ॅपशहर

बिबट्यांचा संघर्ष; बछड्याचा मृत्यू

जंगलातील पानवठे आटल्याने वन्यप्राणी शहराकडे पाण्याच्या शोधात धाव घेत असतानाच शनिवारी रात्रीच्या सुमारास वडाळी परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या भवानी तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्यांमध्ये संघर्ष झाला. यात एका सहा महिन्यांच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

Maharashtra Times 22 May 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम leopard dead in amrawati forest
बिबट्यांचा संघर्ष; बछड्याचा मृत्यू

जंगलातील पानवठे आटल्याने वन्यप्राणी शहराकडे पाण्याच्या शोधात धाव घेत असतानाच शनिवारी रात्रीच्या सुमारास वडाळी परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या भवानी तलावावर पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्यांमध्ये संघर्ष झाला. यात एका सहा महिन्यांच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

पोहरा-मालखेड-चिरोडी जंगलात बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे अनेक घटनांवरून सिद्ध झाले आहे. नारिकांनाही अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असते. जंगलातील नदी, नाले व पानवठे आटल्याने वन्यप्राण्यांना तहान भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी नजीकच्या तलावाकडे धाव घेतात. शनिवारी रात्री बिबट्यासोबतच एक सहा महिन्याचा बछडाही वडाळी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या भवानी तलावात पाणी पिण्यासाठी आले असावे. याच परिसरात त्यांचा संघर्ष होऊन सहा महिन्यांच्या बछड्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज डीएफओ हेमंत मीना यांनी व्यक्त केला आहे. बछड्याचे शवविच्छेदन डॉ. राम खरबडे यांनी केले. त्याच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले.

उत्तरीय तपासणीवरून कळणार नेमके कारण

डॉक्टरांनी त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन केले. त्याची हत्या की हल्ल्यात मृत्यू याचा निष्कर्ष अहवाल आल्यावर कळणार असल्याचे डीएफओ हेमंत मीना यांनी सांगितले. या बछड्याच्या मृत्यूमागे शिकारी असण्याचा अंदाज फेटाळण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज