अ‍ॅपशहर

चिमुकल्याच्या मारेकऱ्याला जन्मठेप

टाकळघाट येथील अथर्व अमरदीप श्रीरामे (३) याची हत्या केल्याचे सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयाचा दंड ठोठावला.

Maharashtra Times 15 Mar 2018, 3:49 pm
नागपूर : टाकळघाट येथील अथर्व अमरदीप श्रीरामे (३) याची हत्या केल्याचे सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. सी. राऊत यांच्या न्यायालयाने मारेकऱ्याला जन्मठेपेची शिक्षा व एक हजार रुपयाचा दंड ठोठावला. विचेत संभाजी वाघमारे (२९ रा. टाकळघाट),असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम life imprisonment to murder
चिमुकल्याच्या मारेकऱ्याला जन्मठेप


३ मार्च २०१७ ला विचेत याने अर्थव याची हत्या करून मृतदेह ढिगाऱ्या खाली लपविला होता. याप्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून विचेतला अटक केली. बुटीबोरीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष वैरागडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षाकडून अॅड. बाबा भांडेकर यांनी युक्तिवाद केला. उपनिरीक्षक डी. एन. मात्रे, सहायक उपनिरीक्षक अरुण भुरे, रमेश भुसारी, भवानीप्रसाद मिश्रा व हेडकॉन्स्टेबल दयाराम करपाते यांनी त्यांना सरकारी कामात मदत केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज