अ‍ॅपशहर

चकमकीत महिला माओवादी ठार

एटापल्ली तालुक्यातील कोटमी परिसरात रविवारी झालेल्या चकमकीत एका महिला माओवादी ठार झाली दोन माओवादी जखमी झाल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे...

Maharashtra Times 26 Mar 2018, 3:03 pm
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोटमी परिसरात रविवारी झालेल्या चकमकीत एका महिला माओवादी ठार झाली. दोन माओवादी जखमी झाल्याचा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maoist women killed in encounter
चकमकीत महिला माओवादी ठार


एटापल्ली तालुक्यात कोटमी परिसर माओवादी कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. या भागात माओवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर प्रभारी पोलिस अधीक्षक राजा आणि माओवादविरोधी अभियानाचे अतिरिक्त अधीक्षक हरी बालाजी यांनी सी-सिक्स्टी कमांडो पथके या भागात पाठविली होती. दोन दिवसांपासून पथकांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते. रविवारी दुपारी लेंगा गावाजवळच्या जंगलात माओवाद्यांसोबत पथकाची चकमक झाली. यात एक महिला माओवादी ठार झाली. घटनास्थळी एक बंदुक तसेच क्लेमोर माइन स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. मोठी घटना घडविण्यासाठी हा स्फोटकांचा साठा सोबत ठेवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत महिला माओवादीची ओळख पटलेली नसली तरी ती कंपनी क्रमांच चारची सदस्य असल्याची शक्यता आहे. रात्री उशीरा तिचा मृतदेह गडचिरोलीत आणण्यात आला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी छत्तीसगडच्या सीमावर्ती भागावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज