अ‍ॅपशहर

शहीद सुमेध गवई यांना अखेरचा निरोप

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोल्याचे जवान सुमेध गवई यांच्या पार्थिवावर लोणाग्रा या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी संपूर्ण पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.

Maharashtra Times 14 Aug 2017, 3:46 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अकोला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम martyred sumedh gawais funeral in akola
शहीद सुमेध गवई यांना अखेरचा निरोप

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोल्याचे जवान सुमेध गवई यांच्या पार्थिवावर लोणाग्रा या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीच्या फैरी झाडून पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी संपूर्ण पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपस्थित होते.

लष्करातील अधिकाऱ्यांनी आज पहाटे लोणाग्रा येथे सुमेध गवई यांचे पार्थिव आणले. गवई यांचे पार्थिव येताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. शहीद गवई यांच्या आई आणि बहिणीला अश्रू अवरता येत नव्हते. त्यांच्या आक्रोशाने प्रत्येकजण हेलावत होता. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास गवई यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर गवई यांच्या सन्माणार्थ बंदुकीच्या फैऱ्या झाडण्यात आल्या. 'वंदे मातरम', 'भारत माता की जय', 'जयहिंद' आणि 'सुमेध गवई अमर रहें'च्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. गवई यांच्या अंतिम संस्काराला पंचक्रोशीतील हजारो गावकरी उपस्थित होते. गवई यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होत असताना अनेकांना अश्रू आवरणे कठीण झाले.

गवई हे चार वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाले होते. त्यांचा लहान भाऊही लष्करात आहे. १ ऑगस्टला सुमेध यांचा वाढदिवस झाला. लवकरच ते सुट्टीवर गावी येणार होते, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. सुमेध यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण गावातच, तर आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण हातरून येथे झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज