अ‍ॅपशहर

विमा रुग्णालयाला दोन कोटींचा निधी

कारखाने, लघु, मध्यम प्रकारातले उद्योग आणि खासगी प्रतिष्ठानांमध्ये घाम गाळणाऱ्या एक लाख ६२ हजार कष्टकरींच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी नागपुरात एकमेव कामगार विमा रुग्णालय चालविले जाते. मात्र, येथील साधनसुविधांचा अभाव, अपुरे मनुष्यबळ आणि उपचार यंत्रांच्या अभावामुळे या लाखो कामगारांची अक्षरशः कुचंबना नेहमीच वादाचा विषय राहिली आहे. ती लक्षात घेता उशिरा का होईना सरकारला जाग आली आहे.

Maharashtra Times 23 Apr 2017, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur 2 crores for vima rugnalaya
विमा रुग्णालयाला दोन कोटींचा निधी

कारखाने, लघु, मध्यम प्रकारातले उद्योग आणि खासगी प्रतिष्ठानांमध्ये घाम गाळणाऱ्या एक लाख ६२ हजार कष्टकरींच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी नागपुरात एकमेव कामगार विमा रुग्णालय चालविले जाते. मात्र, येथील साधनसुविधांचा अभाव, अपुरे मनुष्यबळ आणि उपचार यंत्रांच्या अभावामुळे या लाखो कामगारांची अक्षरशः कुचंबना नेहमीच वादाचा विषय राहिली आहे. ती लक्षात घेता उशिरा का होईना सरकारला जाग आली आहे.

विकासापासून वंचित सोमवारीपेठेतील कामगार विमा रुग्णालयाला राज्य सरकारने दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमधून सध्या अनेक विकासात्मक कामे होत असल्यामुळे विमा रुग्णालयाचा ‘लूक’ हळूहळू बदलत आहे. संघटित क्षेत्रात काम करणारे एक लाख ६२ हजार कामगार ईएसआयसी अंतर्गत विमाधारक आहेत. प्रत्येकी चार व्यक्ती गृहीत धरल्या तर या कुटुंबातील साडेसहा लाखांहून अधिक व्यक्तींना कामगार कायद्यानुसार आरोग्य विमा संरक्षण दिले जाते. असे कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी जुनी मंगळवारी येथे कामगार विमा रुग्णालय चालविले जाते. मागील अनेक वर्षांपासून कामगार विमा रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव होता.

विमा प्रशासनाने अनेकदा राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून निधीची मागणी केली होती. अखेर राज्य शासनाने विमा रुग्णालयाच्या विकासासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला आहे. या निधीतून रुग्णालयाभोवतीची संरक्षण भिंत, क्वार्टर्सचे कम्पाउंड, विविध भिंती, बोअरवेल, शस्त्रक्रियागृह, स्वयंपाकगृह, अपघात विभाग, रुग्णालयाचे प्रवेशद्वार आदींसह विविध विकासकामे केली जात असल्याची माहिती विमा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. मीना देशमुख यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज