अ‍ॅपशहर

शेतकऱ्यांचा ‘तूर संताप’ कायम

मान्सून दाखल होवून पेरणीला सुरुवात झाली असतानाही शेतकऱ्यांकडील तूर खरेदी मात्र ठप्प आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

Maharashtra Times 25 Jun 2017, 4:03 am
म.टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur agitation for farmers toor purchasing
शेतकऱ्यांचा ‘तूर संताप’ कायम


मान्सून दाखल होवून पेरणीला सुरुवात झाली असतानाही शेतकऱ्यांकडील तूर खरेदी मात्र ठप्प आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.

राज्यभरात तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले आहे. परंतु, एकूणच तूर खरेदीच्या विषयावरून शासनाममोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सुरुवातीला बारदान्यांमुळे तूर खरेदीस नकार देणाऱ्या नाफेड व अन्य संस्थांचा नकारघंटा अद्यापही कायम आहे. यातूनच राज्यभरात आंदोलने पेटत आहेत. शनिवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तूर खरेदी विरोधात आंदोलन छेडत दर्यापूर येथे तूर खरेदी बंद असल्याने तेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठिय्या आंदोलन केले. नाफेडने ३० मेपर्यंत तुरीची खरेदी केली. परंतु, मार्केट यार्डात जागा नसल्याने त्यांनी खरेदी थांबविली. मात्र, आतातरी खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. शासनविरोधी घोषणा देत संतप्त कार्यकर्त्यांनी नाफेडला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. काँग्रेसचे अमरावती लोकसभा अध्यक्ष सागर देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यात ४ ‌लाख ३९ हजार ७७८ क्विंटल तूर खरेदी शिल्लक असून दर्यापुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडतर्फे ४ लाख ३०८ टोकण देण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यापैकी १ हजार ७०० टोकनचे मोजमाप झाले असून उर्वरित टोकणचे जवळपास ७४ हजार ५०६ क्विंटल तुरीचे मोजमाप नाफेडने केला नसल्याचा आरोप करीत, शेतकऱ्यांनी या तुरीचे करायचे काय असा, असा सवालही यावेळी उपस्थित केला.

या ठिय्या आंदोलनात हरिभाऊ गाळकर, शिवाजी देशमुख, जिल्हा सचिव सागर देशमुख, प्रकाश देशमुख, संजय देशमुख, नावेदभाई, गणेश लाखे, मंगेश पांडे, हिमांशु देशमुख, नीलेश देशमुख, अब्दूल शाहीद अब्दूल सादीक, मंगेश आवठे, सुभाषराव कोथकर, योगेश अग्रवाल यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज