अ‍ॅपशहर

बी फॉर्मचा घोळ आला काँग्रेसच्या अंगलट

बी फॉर्मची पळवापळवी, चोरी, विक्री या परंपरेच्या मालिकेत, यंदा दोन बी फॉर्मचे प्रताप काँग्रेसचे पानिपत होण्याचे आणखी एक कारण ठरले. तब्बल २९ प्रभागांत हा प्रकार घडल्याने काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असेच चित्र होते. यातील एखाददोन अपवाद वगळता सर्वत्र काँग्रेसला फटका बसला.

Maharashtra Times 24 Feb 2017, 5:48 am
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur b form issue boomrang on congress
बी फॉर्मचा घोळ आला काँग्रेसच्या अंगलट


बी फॉर्मची पळवापळवी, चोरी, विक्री या परंपरेच्या मालिकेत, यंदा दोन बी फॉर्मचे प्रताप काँग्रेसचे पानिपत होण्याचे आणखी एक कारण ठरले. तब्बल २९ प्रभागांत हा प्रकार घडल्याने काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असेच चित्र होते. यातील एखाददोन अपवाद वगळता सर्वत्र काँग्रेसला फटका बसला.

नेत्यांमधील कलगीतुरा आणि समर्थकांसाठी झालेल्या रस्सीखेचीतून २९ जागांवर दोन बी फॉर्म आले. या घडामोडीत कार्यकर्त्यांचे विभाजन झाले. संभ्रमामुळे काँग्रेसला जागा गमवाव्या लागल्या. प्रभाग ६ ब आणि प्रभाग क्रमांक ७ ब मधून जाहिदा बेगम हमीद अन्सारी यांना दोन्ही प्रभागांतून बी फॉर्म देण्यात आले. त्याचा निकाल अखेरपर्यंत लागला नाही. प्रभाग २ ब मधून दिनेश यादव, दिलीप रोडे व गोपाल रोडे अशा तिघांना बी फॉर्मचे वाटप झाले. एकाच जागेवर तीन बी फॉर्मनंतरही यादव यांना पक्षाचा झेंडा फडकवता आला.

प्रभाग क्रमांक एकमधून मीना यादव व प्रियंका सावलानी अशा दोघींना बी फॉर्मचाही फटका काँग्रेसला बसला. सावलानींनी माघार घेतल्यानंतरही यादव यांना पराभूत व्हावे लागले. प्रभाग ३ ड मधून साहिना अन्सारी व सुनीता ढोले यांच्या बी फॉर्मने घोळ केला. ढोले यांचे नाव प्राथमिक यादी व चर्चेत नव्हते. दोघीही पराभूत झाल्या. प्रभाग ४ अ मध्ये सत्यशीला काळे आणि कल्पना गोस्वामी यांनाही घरी बसावे लागले. प्रभाग ५ डमध्ये मंगेश सातपुते व शंकर देवगडे यांना मतादारांनी नाकारले. प्रभाग क्रमांक ९ मधून काँग्रेसकडून किशोर जिचकार यांना बी फॉर्म देण्यात आल्यानंतर लोकमंचकडून विनील चौरसिया यांना बी फॉर्म देण्यात आला. प्रभाग १३ मधून छाया पिंपळे व कमलादे‍वी यादव, प्रभाग १४ मधून राजेश्वरी बंदेला व शशिकला वडे यांच्याकडे बी फॉर्म होते. त्यातून घोळ वाढला. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्रदीप अग्रवाल व राजकुमार कमनानी यांच्याकडे बी फॉर्म होते. कमनानी यांना पक्षाने संधी दिली. अग्रवाल यांचे बंड कमनानी यांना मारक ठरले. बी फॉर्मच्या घोटाळ्याचा फायदा प्रतिस्पर्ध्यांनी उचलला व काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेले घास हिरावले गेले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज