अ‍ॅपशहर

शाळांची आंतरराष्ट्रीय भरारी

नागपूर : राज्यातील जिल्हा परिषदेच्या १०० शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचे प्रयत्न सरकारचे आहेत. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' अंतर्गत झेडपी शाळा आंतरराष्ट्रीय भरारी घेणार आहेत. केंम्ब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांची एक समिती महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या अभ्यासासाठी १४ ते २१ जानेवारी या कालावधीत भेट देणार आहे.

Maharashtra Times 14 Jan 2017, 4:30 am
नागपूर : राज्यातील जिल्हा परिषदेच्या १०० शाळांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचे प्रयत्न सरकारचे आहेत. ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र' अंतर्गत झेडपी शाळा आंतरराष्ट्रीय भरारी घेणार आहेत. केंम्ब्रिज विद्यापीठातील तज्ज्ञांची एक समिती महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेच्या अभ्यासासाठी १४ ते २१ जानेवारी या कालावधीत भेट देणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur cambridge university committee to visit over 100 schools
शाळांची आंतरराष्ट्रीय भरारी


समितीचे सदस्य डेन ब्रें यांच्यासह दोन अधिकारी १८ जानेवारीला शहरातील शाळांना भेट देतील. जिल्हा परिषदांच्या शाळांची गुणवत्ता ढासळली आहे, असे नेहमीच बोलले जाते. मात्र, या शाळांचा कायापालट केल्यास विद्यार्थ्यांसाठी आजही गुणवत्तापूर्ण शिक्षण येथेच मिळते. या सर्व चर्चा फोल ठरवत शाळांमधील गुणवत्तावाढीच्या दृष्टिकोनातून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रअंतर्गत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. 'ज्ञानरचनावादा'सह कौशल्य विकासाचे शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. उपक्रमांमुळे नामांकित शाळांतील विद्यार्थ्यांपेक्षा एक पाऊल सरस, अशी प्रतिमा काही शाळांनी तयार केली आहे. या शाळांनी आता आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांच्या स्पर्धेत उतरावे, यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न चालविले आहे. त्यासाठी केंम्ब्रिज विद्यापीठातील तज्‍ज्ञ समिती मदत करेल. ही समिती नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील निलडोह येथील शाळांची १८ जानेवारी रोजी तपासणी करेल.


विद्यार्थ्यांसोबत संवाद
समिती रविनगरातील राज्य विज्ञान संस्था येथे विदर्भातील सर्वच जिल्ह्यतील शिक्षण अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे. समिती शासकीय बीएड कॉलेजला भेट देऊन डायट अंतर्गत येणाऱ्या रविनगरातील सराव शाळेला भेट देणार आहे. तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांशी चर्चा करतील. ही समिती राज्यभरातील शाळांमधील शिक्षणाचा आढावा घेऊन राज्य शासनाकडे अहवाल सादर करणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज