अ‍ॅपशहर

‘छत्रपती’चे उद्ध्वस्त होणे अन् नवनिर्मिती...

मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी छत्रपती चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला. त्याला आज, रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त...

Maharashtra Times 19 Nov 2017, 4:00 am
मेट्रो रेल्वेच्या बांधकामासाठी छत्रपती चौकातील उड्डाणपूल पाडण्यात आला. त्याला आज, रविवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur chhatrapati rob destroy issue
‘छत्रपती’चे उद्ध्वस्त होणे अन् नवनिर्मिती...


छत्रपती पुलाची निर्मिती

नागपूर : मिहानला गती मिळावी, यासाठी वर्धा मार्गावरील छत्रपती पूल बांधण्यात आला होता. पाच कोटींत बांधण्यात आलेल्या पुलाची किंमत तो पाडला तेव्हा ४० कोटी होती. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांच्या काळात वर्धा मार्गावरील पूलनिर्मिताचा पाया रचण्यात आला. १९९७ मध्ये हा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अवघ्या एक वर्षात हा पूल बांधून तयार झाला होता. या पुलाची लांबी ४०० मीटर होती.

सात दिवसांत पाडला पूल

वर्धा मार्गावरील छत्रपती पूल १५ दिवसांत तोडू, असे उद्दिष्ट ठेऊन सुरू करण्यात आलेले छत्रपती पूल तोडण्याचे काम मते अॅण्ड असोसिएट्सने अवघ्या सात दिवसांत पूर्ण केले. मेट्रो रेल्वेच्या अभियंत्यांसह एकूण ३० अभियंते आणि शंभर प्रशिक्षित कामगारांसह एकूण अडीचशे कामगारांनी ही मोहीम फत्ते केली. जॉ क्रशर या मशिनीसह वायर सॉ आणि वॉल सॉ यांसारख्या अधिक शक्तिशाली मशिनींचा वापर करून पूल तोडण्यात आला. आठवणींना उजाळा देण्यासाठी दोन पिलर तसेच ठेवण्यात आले आहेत.

५५ पीअर झाले उभे

वर्धा मार्गावरील ४०० मीटर लांबीचा छत्रपती उड्डाणपूल पाडून हॉटेल अलजमजम ते प्राइड हॉटेल असा तीन किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. हा पूल तयार करण्यासाठी १०५ गर्डर तयार करावे लागतील. १२ गर्डर तयार झाले आहेत. १०५ पिलरपैकी ५५ पिलर तयार झाले आहे. सप्टेंबर २०१८ पर्यंत हा पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

असा बनेल नवीन पूल

वर्धा मार्गावरील ४०० मीटर लांबीचा छत्रपती उड्डाणपूल पाडून हॉटेल अलजमजम ते प्राइड हॉटेल असा तीन किलोमीटर लांबीचा नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. उज्ज्वलनगर ते वर्धा मार्गावरील हॉटेल सेंटर पॉइंट हॉटेलपर्यंत आरओबी बांधण्यात येत असून, यावर मेट्रो रेल्वेचा मार्ग तयार करण्यात येणार आहे. पडण्यापूर्वीचा हा उड्डाणपूल आणि भविष्यातील उड्डाणपूलांचे संकल्पचित्र.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज