अ‍ॅपशहर

कसा चालविता तुम्ही महाराष्ट्र?

शिक्षणाच्या आधुनिक सोयी नसलेल्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

Maharashtra Times 2 May 2016, 4:27 am
म.टा.प्रतिनिधी, नागपूर शिक्षणाच्या आधुनिक सोयी नसलेल्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील प‌हिली पाच गावे डिजिटल करण्याच्या प्रकल्पाला रविवारपासून प्रारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या डिजीटल इंडिया अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील खंडाळा, कामठी तालुक्यातील खसाळा व तरोडी, हिंगणा तालुक्यातील दाभा आणि नागपूर ग्रामीणमधील विहीरगाव ही पाच गावे डिजीटल करण्यात येणार आहे. या गावांमधील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शाळा येथील कर्मचारी व विद्यार्थ्यांशी फडणवीस यांनी संवाद साधला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur chief minister chats with students by video conferensing
कसा चालविता तुम्ही महाराष्ट्र?


विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद घडवून आणण्याकरिता तरोडी येथील जिल्हा परिषद शाळेची निवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक बालसुलभ प्रश्न विचारले. एवढ्या मोठ्या महाराष्ट्र राज्याचा कारभार तुम्ही कसा चालविता, काय काय कामे करता असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी फडणवीस यांना विचारले. मुख्यमंत्र्यांनी ‌या सर्व प्रश्नांची मनमोकळी उत्तरे दिली. शाळेतील सुविधा कशा आहेत, तुमचे आदर्श कोण आहेत, असे काही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी देखील विचारले. सुमारे १५ ते २० मिनिटांपर्यंत चाललेल्या या संवादात विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांना तरोडीच्या शाळेला भेट देण्याचे निमंत्रणही दिले.

या शाळेतील ई-क्लास सुविधेचे निरीक्षणही मुख्यमंत्र्यांनी केले. तरोडीसह इतरही गावातील शाळांमध्ये डिजीटल सुविधा या कार्यक्रमांतर्गत येत्या काळात पुरविण्यात येणार आहे. या पाच गावांतील शाळांमध्ये शासनाच्या वतीने डिजिटल सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज