अ‍ॅपशहर

डिक्की घडविणार ३०० महिला उद्योजक

उद्योग उभारणीसाठी प्रत्येक राष्ट्रीयीकृत बॅँकेने किमान एका महिलेला आर्थिक सहाय करण्याची ‘स्टॅँड अप इंडिया’ योजना केंद्र सरकारने आखली आहे. डिक्की सुपर ५० फाउंडेशनने यंदा ३०० महिलांना होजियरी डिजायनिंग व गारमेंट उत्पादनाचे प्रशिक्षण दिले आहे. या महिलांना समूह उद्योजक बनविण्याचे डिक्की विदर्भ चाप्टरचे प्रयत्न आहेत. डिक्कीच्या प्रयत्नामुळे सरकारने महिलांसाठी अनेक योजना सादर केल्या असून महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दलित इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या महिला विंगतर्फे आयोजित चर्चासत्रात करण्यात आले.

Maharashtra Times 11 Mar 2016, 4:00 am
म.टा. प्रतिनिधी, नागपूर उद्योग उभारणीसाठी प्रत्येक राष्ट्रीयीकृत बॅँकेने किमान एका महिलेला आर्थिक सहाय करण्याची ‘स्टॅँड अप इंडिया’ योजना केंद्र सरकारने आखली आहे. डिक्की सुपर ५० फाउंडेशनने यंदा ३०० महिलांना होजियरी डिजायनिंग व गारमेंट उत्पादनाचे प्रशिक्षण दिले आहे. या महिलांना समूह उद्योजक बनविण्याचे डिक्की विदर्भ चाप्टरचे प्रयत्न आहेत. डिक्कीच्या प्रयत्नामुळे सरकारने महिलांसाठी अनेक योजना सादर केल्या असून महिलांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दलित इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या महिला विंगतर्फे आयोजित चर्चासत्रात करण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur diccis women impowerment drive
डिक्की घडविणार ३०० महिला उद्योजक


महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर डिक्कीच्यावतीने एक दिवसीय कार्यक्रमात महिलांना स्वयंरोजगार व उद्योगी बनविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयो‌जन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डिक्की विदर्भ चाप्टरचे अध्यक्ष निश्चय शेळके होते. प्रमुख वक्त्या म्हणून ग्रेस ब्युटी क्लिनिकच्या संचालक डॉ. स्मीता नगरकर, सहायक पोलिस निरीक्षक ममता नंदागवळी, उद्योजिका मनिषा चरपे, डिक्की विदर्भ महिला विंगच्या अध्यक्षा विनी मेश्राम यांची उपस्थिती होती. ‘महिला या कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा सरस कामगिरी करू शकतात. संवेदनशीलता आणि मातृत्वाच्या उपजत कौशल्यामुळे त्यांच्यात पुरुषांइतकीच क्षमता असते’, असा सूर या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आला.

डिक्की विदर्भ चाप्टरचे अध्यक्ष शेळके यांनी, महिलांनी चूल आणि मूलातच गुंतून राहु नये, असे आवाहन केले. यावेळी विनी मेश्राम, सहायक पोलिस निरीक्षक नंदागवळी यांनीही संबोधित केले. महिला विंगच्या उद्योजिका क्रांती गेडाम, अंजली साखरकर, शिल्पा गणवीर, अर्चना खोब्रागडे, वैशाली गोस्वामी, अश्विनी महाजन यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज