अ‍ॅपशहर

​ स्वप्नपूर्तीसाठी व्हावा प्रयत्न...

मुलांच्या प्रत्येक स्वप्नाची, त्यांच्या भविष्याविषयीच्या कल्पनेची खरे तर यादी करून ठेवावी. ती आपल्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवावी. आपल्या मनात ठेवावी. जेणेकरून त्याची आपल्याला सतत जाणीव होत राहावी. स्वप्न ही आपल्या प्रगतीकरिता फार महत्त्वाची असतात.

Maharashtra Times 27 Mar 2017, 4:00 am
आपले बहुतेकांचे आवडते; डॉ. अब्दुल कलाम म्हणाले होते, ‘स्वप्नं ती नसतात जी आपण झोपेत बघतो. स्वप्नं ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत.’ स्वप्न पडणे किंवा स्वप्न बघणे ही एक नैसर्गिक घटना आहे. स्वप्न हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील अभिन्न अंग आहे. झोपेचे मुख्य दोन भाग असतात. एक हलकी (आरईएम) झोप आणि एक गाढ (नॉन आरईएम) झोप. मोठ्या लोकांमध्ये हलक्या झोपेचं प्रमाण पूर्ण झोपेच्या २० टक्के इतके असते. आईच्या पोटामध्ये असताना मुलांमध्ये ८० टक्के हलकी झोप असते. लहान मुलांमध्ये याचे प्रमाण ६० टक्के असते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur dr chandrashekhar meshram column
​ स्वप्नपूर्तीसाठी व्हावा प्रयत्न...


स्वप्न पाहणे किंवा स्वप्न पडणे ही प्रक्रिया जन्म व्हायच्या आधीच सुरू होते. आपण हलक्या झोपेमध्ये स्वप्न बघतो किंवा स्वप्न पडतात ती मुळात हलक्या झोपेमध्येच. आपण झोपेत असलेल्या नवजात बाळाकडे उत्सुकतेने, कौतुकाने बघतो तेव्हा आपल्याला दिसते की ते मध्ये स्मित करते. हसतात. मध्येच त्याच्या चेहेऱ्यावरचे हावभाव बदलतात. हे बहुदा बाळाला पडणाऱ्या स्वप्नांमुळे असावे. स्वप्नावर अनेक वैज्ञानिकांनी बरेच संशोधन केले आहे. स्वप्न बघणे आणि त्याचा अर्थ यावर विविधांनी विचार मांडले गेले आहेत. काही लोकांना स्वप्न आवडतात. काहींना आवडत नाहीत. काही स्वप्न हसवणारी असतात तर काही भीतीदायक असतात. काही स्वप्न आठवता येतात तर काही लक्षात राहात नाहीत. वेगवेगळ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या वयात पडणारी स्वप्ने अनोखी असतात.

मुलांच्या प्रत्येक स्वप्नाची, त्यांच्या भविष्याविषयीच्या कल्पनेची खरे तर यादी करून ठेवावी. ती आपल्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवावी. आपल्या मनात ठेवावी. जेणेकरून त्याची आपल्याला सतत जाणीव होत राहावी. स्वप्न ही आपल्या प्रगतीकरिता फार महत्त्वाची असतात. स्वप्न कोणतेही असो. कोणती स्थळे बघायची याचे वा खूप पैसे कमवायचे आहेत याचेही, ही स्वप्न तुमची तुम्हीच बघायला हवीत. आपली स्वप्ने दुसऱ्याला बघू देऊ नका. कारण तुम्हालाच ठाऊक असते काय आवडते नि आनंद कशात मिळणार ते.

आपले स्वप्न खरे झाले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटते. मात्र त्यासाठी योग्य प्रयत्न, मेहनत गरजेची असते. संजय माझ्याबरोबर शाळेत होता. डॉक्टर व्हायचे त्याचे स्वप्न होते. त्याला डॉक्टर बनवायची त्याच्या मोठ्या भावाची इच्छा जास्त होती. तो अतिशय हुशारही होता. बी.एस.सी.च्या पहिल्या वर्षालाच त्याने डॉक्टरांचा अॅप्रन विकत घेतला. पण मेडिकल प्रवेश घेण्यासाठी लागणारा अभ्यास केला नाही. सचिन तेंडुलकर हा तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या प्रशिक्षकाने त्याला मैदानात जाऊन क्रिकेट खेळायला सांगितले. परंतु तो बाहेर बसून मित्रांना टाळ्या वाजवून प्रोत्साहित करीत होता. सामना संपला तेव्हा प्रशिक्षकाने सचिनला विचारले तू किती धावा काढल्या. सचिनने सांगितले मी खेळलो नाही. मित्रांसाठी टाळ्या वाजवत होतो. प्रशिक्षक चिडले आणि सचिनच्या गालावर जोरात थापड मारली आणि सांगितले दुसऱ्यांना तुझ्यासाठी टाळ्या वाजवू दे. तू स्वतःसाठी टाळ्या वाजव. दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवण्यात वेळ घालवू नको. सचिनच्या मनावर ती थापड आणि तो उपदेश नेहमीकरिता कोरला गेला. एखादा क्षण तुमचे आयुष्य कसे बदलवू कतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. अनेक पालक आपली स्वप्ने मुलांवर लादतात. यामुळे फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. पालकांनी मुलांना स्वप्ने बघण्यासाठी प्रोत्साहित करावे, ती लादू नये. आणि सांगावे, स्वप्न अपुरी राहिली तरी उदास होऊ नको. आयुष्य अतिशय सुंदर आहे. तुटलेल्या स्वप्नामुळे ते संपविण्याचा प्रयत्न करू नकोस. बालपणाचा आणि स्वप्नपूर्तीच्या प्रवासाचा आनंद घ्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज