अ‍ॅपशहर

चार वर्षांनंतर बुब्बुळ प्रत्यारोपण

इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो)तर्फे बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या प्रस्तावाला सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली. मात्र, त्यासाठीचा युजर नेम आणि पासवर्ड न दिल्याने गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले बुब्बुळ प्रत्यारोपण गुरुवारी मार्गी लागले. मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केलेला नेत्रदाता मिळाल्याने मेयोत चार वर्षांच्या खंडानंतर पहिले बुब्बळ प्रत्यारोपण करीत एकाच्या डोळ्यांत प्रकाशपेरणी करण्यात आली.

Maharashtra Times 2 Dec 2016, 4:00 am
नागपूर : इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो)तर्फे बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या प्रस्तावाला सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली. मात्र, त्यासाठीचा युजर नेम आणि पासवर्ड न दिल्याने गेल्या दोन महिन्यांपासून रखडलेले बुब्बुळ प्रत्यारोपण गुरुवारी मार्गी लागले. मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केलेला नेत्रदाता मिळाल्याने मेयोत चार वर्षांच्या खंडानंतर पहिले बुब्बळ प्रत्यारोपण करीत एकाच्या डोळ्यांत प्रकाशपेरणी करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur eyeball transplantation after four years
चार वर्षांनंतर बुब्बुळ प्रत्यारोपण


मेयोच्या नेत्रविभागात बुब्बुळ प्रत्यारोपण होत नसल्यामुळे वारंवार विचारणा होत असे. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाकडे चार वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित असल्याचे पुढे आले होते. मेयोत २०१२ मध्ये बुब्बुळ प्रत्यारोपणाला मंजुरी देण्यात आली होती. महिनाभरापूर्वी या प्रस्तावाच्या नूतनीकरणाला आरोग्य विभागाने मंजुरी दिली होती. त्यामुळे नेत्ररोग विभागात ‘अंधार’ दाटलेल्या डोळ्यांत प्रकाशकिरणे पेरण्याची सोय झाली. परंतु परवानगी मिळाल्यानंतर बुब्बुळ प्रत्यारोपणासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यात या विभागाला वेळ मिळत नव्हता. दुसऱ्या बाजूला नेत्रदानासंदर्भात ऑनलाइन प्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागानेदेखील मेयोला युजरनेम आणि पासवर्ड पाठविला नव्हता. त्यामुळेही नेत्रदान करण्यास इच्छुक असलेल्यांची आणि नेत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्यांची नोंद घेणे दुरापास्त होऊन बसले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज