अ‍ॅपशहर

दहा हजारांसाठी शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जमाफीदरम्यान हंगामाच्या सोयीसाठी सरकारने दहा हजारांची तातडीची मदत देण्याचे जाहीर केले. मात्र पेरणी उलटल्यानंतर ही मदत मिळालेली नाही. या विंचनेतूनच रिसोड तालुक्यातील पळसखेड येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. श्रीराम मोतीराम गिऱ्हे (५०) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. श्रीराम यांच्या पत्नीच्या नावे अडीच एकर शेतजमीन आहे.

Maharashtra Times 7 Aug 2017, 2:22 am
वाशीम : कर्जमाफीदरम्यान हंगामाच्या सोयीसाठी सरकारने दहा हजारांची तातडीची मदत देण्याचे जाहीर केले. मात्र पेरणी उलटल्यानंतर ही मदत मिळालेली नाही. या विंचनेतूनच रिसोड तालुक्यातील पळसखेड येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. श्रीराम मोतीराम गिऱ्हे (५०) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. श्रीराम यांच्या पत्नीच्या नावे अडीच एकर शेतजमीन आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur farmer suicide
दहा हजारांसाठी शेतकऱ्याची आत्महत्या


या शेतीच्या भरवशावर आपल्या कुटुंबीयांची उपजिविका करीत होते. मात्र नापिकीने त्यांना कर्ज फेडणे अशक्य झाले होते. त्यातच कर्जमाफी जाहीर होऊन सरकारने दहा हजारांची तातडीची मदत देणार असल्याने हंगामाची सोय झाल्याच्या आनंदात होते. त्यासाठी त्यांनी वारंवार बँकेचे उंबरठे झिजविले.

मात्र निकष आणि नियमात बदल होत असल्याने बँक अधिकाऱ्यांकडून त्यांना मदत मिळू शकली नाही. यातच त्यांनी सकाळी शेतावर जाऊन गळफास घेतला. बराच वेळ होऊनही ते न परतल्याने कुटुंबीयांनी शेतावर जावून पाहिले असता घटना समोर आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज