अ‍ॅपशहर

गौरव रेगे, राशी लांबे चॅम्पियन

गौरव रेगे आणि राशी लांबे यांनी शनिवारी डीएनसी इन्डोअर सभागृहात संपलेल्या गोयल गंगा जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात विजेतेपदाचा मान मिळविला. नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेद्वारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Maharashtra Times 1 Aug 2016, 4:00 am
म.टा.क्रीडा प्रतिनिधी, नागपूर गौरव रेगे आणि राशी लांबे यांनी शनिवारी डीएनसी इन्डोअर सभागृहात संपलेल्या गोयल गंगा जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात विजेतेपदाचा मान मिळविला. नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेद्वारे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur gaurav rege rashi lambe champion
गौरव रेगे, राशी लांबे चॅम्पियन


पुरुषांच्या अंतिम सामन्यात रेगेने वरद गजभिये याचा पराभव केला. २१ वर्षांच्या रेगेने गजभियेचे आव्हान २१-१५, २१-१८ ने मोडीत काढले. गौरवची एखाद्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची ही तिसरी वेळ असून ओळीने मिळविलेले दुसरे जेतेपद आहे. राशीने महिला गटाच्या अंतिम सामन्यात प्रियंका पिल्लेवर २१-५, २१-१७ ने विजय नोंदविला. नवव्या वर्गाची विद्यार्थिनी असलेली १५ वर्षांची राखी ही सर्वांत युवा चॅम्पियन ठरली. राशीचे सिनियर गटात हे पहिलेच जेतेपद ठरले. रेगे आणि लांबे यांनी नंतर आपापल्या सहकार्‍यांसह खेळून दुहेरीचे विजेतेपदही पटकविले. पुरुष दुहेरीत चौथी मानांकित जोडी गौरव रेगे- प्रतीक बोडे यांनी अव्वल मानांकन असलेली जोडी गत विजेते अजय दयाल- जयेंद्र ढोले यांच्यावर २१-१३, २१-१९ ने विजय साजरा केला. यश पुंडलिक- राशी लांबे यांनी मिश्र प्रकाराच्या अंतिम सामन्यात वरद गजभिये- प्रियंका पिल्ले यांचा १२-२१, २१-१६, २१-१0 ने पराभव केला. १९ वर्षे मुलांच्या गटात अंतिम सामन्यात दिविज शाह- गंधार नवले जोडीने अनुज कानेटकर- विनय माकोडे यांचा २१-१८, २१-१७ अशा फरकाने पराभव केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज