अ‍ॅपशहर

पाण्याच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचार

पाणी पाजण्याच्या बहाण्याने २८ वर्षीय नराधमाने तीनवर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना बिडगाव येथे शुक्रवारी रात्री उघडकीस आली. नंदनवन पोलिसांनी छबी देवांगण या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Times 8 Oct 2017, 4:00 am
नागपूर : पाणी पाजण्याच्या बहाण्याने २८ वर्षीय नराधमाने तीनवर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. ही खळबळजनक घटना बिडगाव येथे शुक्रवारी रात्री उघडकीस आली. नंदनवन पोलिसांनी छबी देवांगण या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur girl raped by man
पाण्याच्या बहाण्याने चिमुकलीवर अत्याचार


पीडित मुलीचे आई-वडील बिट्टू शाहू यांच्या बिडगाव येथील वाना धर्मकाटा येथे काम करतात. शाहू यांनी त्यांना धर्मकाट्याजवळीलच एका इमारतीत एक खोली राहायला दिली होती. या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर छबी राहातो. तोही धर्मकाटा येथे काम करतो. शुक्रवारी पी‌डित मुलीचे आई-वडील तेथे राहायला आले. त्यांनी खोली स्वच्छ केली. यादरम्यान पीडित मुलीला तहान लागली. छबी याने पाणी पाजण्याच्या बहाण्याने तिला पहिल्या माळ्यावरील खोलीत नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केला. मुलगी परत न आल्याने तिचे वडील तिला आणायला गेले. यावेळी छबी हा आक्षेपार्ह अवस्थेत दिसला. व‌डील तिला घेऊन खोलीत आले. तिच्या आईने तिची आंघोळ घातली. यावेळी छबी याने अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. पीडित मुलीचे वडील संतापले. त्यांनी छबी याला जाब विचारला. दोघांमध्ये वादही झाला. त्यानंतर वडील पीडित मुलीला घेऊन डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यानंतर पीडित मुलीसह आई-वडील नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये आले. पोलिसांनी छबीविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. पीडित मुलीचे नातेवाईक पोलिसांत तक्रार करणार असल्याचे समजल्याने छबी पसार झाला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. डी. नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवन पोलिस छबी याचा शोध घेत आहेत.


१७ वर्षीय मुलाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलाने १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुलगा शिक्षण घेत आहे. मुलगी दहाव्या वर्गात शिकते. दोघेही जरीपटक्यात एकाच भागात राहतात. ऑक्टोबर २०१६ मध्ये या दोघांत प्रेम फुलले. लग्नाच्या आणाभाका घेत बालोद्यान व अन्य ठिकाणी दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. २३ सप्टेंबरला मुलगा व मुलगी बोलत होते. मुलीच्या वडिलांना दोघे दिसले. त्यांनी मुलीला विचारणा केली. प्रेमसंबंध असून, मुलाने अत्याचार केल्याचे मुलीने वडिलांना सांगितले. व‌डील तिला घेऊन जरीपटका पोलिस स्टेशनमध्ये आले. मला वडिलांसोबत राहायचे नसल्याने तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तिला सुधारगृहात पाठविले. तेथे वैद्यकीय तपासणीनंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. वेळोवळी मुलाने अत्याचार केल्याची तक्रार मुलीने दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज