अ‍ॅपशहर

पोलिसांनो, खुशाल जा ‘महाराष्ट्र दर्शन’ला

पोलिस कर्मचारी अन् रजा याचा दूरदूरपर्यंत संबंध नसल्याची ओरड विभागात नेहमीच होते. रजा मिळाली नाही तर कर्मचारी आजारी रजेवर जातात. आजारी रजा घेतली तर पगार कपात करण्याचेही प्रकार समोर आले आहेत. मात्र, आता पोलिसांना रजा मिळणार आहे. तेही महाराष्ट्र दर्शनासाठी. महाराष्ट्र दर्शन रजेसह एक हजार रुपयांचे अनुदानही कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे. मध्यवर्ती पोलिस कल्याण निधी व्यवस्थापन समितीची अलीकडेच बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलिसांना मिळालेले हे ‘गिफ्ट’ असल्याची चर्चा विभागात आहे.

अविनाश महाजन | Maharashtra Times 14 Aug 2017, 4:00 am
नागपूर : पोलिस कर्मचारी अन् रजा याचा दूरदूरपर्यंत संबंध नसल्याची ओरड विभागात नेहमीच होते. रजा मिळाली नाही तर कर्मचारी आजारी रजेवर जातात. आजारी रजा घेतली तर पगार कपात करण्याचेही प्रकार समोर आले आहेत. मात्र, आता पोलिसांना रजा मिळणार आहे. तेही महाराष्ट्र दर्शनासाठी. महाराष्ट्र दर्शन रजेसह एक हजार रुपयांचे अनुदानही कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे. मध्यवर्ती पोलिस कल्याण निधी व्यवस्थापन समितीची अलीकडेच बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलिसांना मिळालेले हे ‘गिफ्ट’ असल्याची चर्चा विभागात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur maharashtra darshan scheme for police
पोलिसांनो, खुशाल जा ‘महाराष्ट्र दर्शन’ला


या समितीचे अध्यक्ष पोलिस महासंचालक आहेत. नुकताच मुंबई येथे झालेल्या बैठकीत पुणे ग्रामीणच्या अधीक्षकांनी राज्य पोलिस दलातील पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत व एक हजार रुपये अनुदान देण्याच्या तरतुदीचा मुद्दा उपस्थित केला. पोलिस कल्याण निधीचे सदस्य असणाऱ्या लिपिकांनाही ही योजना लागू करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यांची ही मागणी मान्य करण्यात आली. नियमितरीत्या पोलिस कल्याण निधीची वर्गणी जमा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत व अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पोलिसांसह लिपिकांनाही या सवलतीचा लाभ देण्यात येणार आहे. याबाबत लवकरच परिपत्रक काढण्यात येणार असल्याचा निर्णयही समितीने घेतला.



निवृत्तीनंतर ‘किट पेटी’ही मिळणार!

विभागात रुजू होताच पोलिस कर्मचाऱ्यांना गणवेश व अन्य साहित्य ठेवण्यासाठी लोखंडी ‘किट पेटी’ देण्यात येते. सुमारे ३० ते ४० वर्षांपर्यंत ही किट पेटी कर्मचाऱ्यांसोबत असते. त्यामुळे या पेटीसोबत कर्मचाऱ्यांच्या भावना जुळतात. निवृत्तीनंतर मात्र ती पोलिस मुख्यालयात जमा करावी लागते. सेवेची आठवण म्हणून ती पोलिस कर्मचाऱ्याकडेच ठेवण्याची विनंती बैठकीत करण्यात आली. ती पुन्हा वापरण्यासाठी योग्य नसल्याचे मत घटकप्रमुखाने दिल्यास ती संबंधित कर्मचाऱ्याला देण्यात यावी, असा निर्णयही समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज