अ‍ॅपशहर

वैद्यकीय प्रवेश समितीला कोंडले

अनुसूचित जमातीचे (एसटी) वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात यावे, अशी जोरदार मागणी करीत मूलनिवासी आदिवासी हक्क संघर्ष महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी धडक मोहीम राबवत अधिष्ठाता कार्यालयाचे दार बंद केले. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश समिती आत कोंडली गेली. तब्बल तासभर चाललेल्या या गोंधळामुळे परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

Maharashtra Times 26 Jun 2016, 4:00 am
नागपूर : अनुसूचित जमातीचे (एसटी) वैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात यावे, अशी जोरदार मागणी करीत मूलनिवासी आदिवासी हक्क संघर्ष महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी धडक मोहीम राबवत अधिष्ठाता कार्यालयाचे दार बंद केले. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश समिती आत कोंडली गेली. तब्बल तासभर चाललेल्या या गोंधळामुळे परिसरात जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur medical college dean locked
वैद्यकीय प्रवेश समितीला कोंडले


मेडिकलमध्ये सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. यात एसटीचे जातवैधता प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांनादेखील सामावून घेतले जात आहे. त्याची कुणकूण लागल्याने आदिवासी हक्क संघर्ष महासंघाचे कार्यकर्ते मेडिकलमध्ये दाखल झाले. या उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेत सामावून घेतले जाऊ नये, अशी जोरदार घोषणाबाजी त्यांनी सुरू केली. एसटीसाठी रा‍खीव वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांवर बोगस आदिवासींनी ताबा मिळविला आहे. याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी राज्य सरकारने अनुसूचित जाती-जमाती प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी पडताळणी समिती नियुक्त केली आहे. समितीचे प्रमाणपत्रच ग्राह्य धरावे, त्याशिवाय प्रवेशप्रक्रियेत सामावून घेतले जाऊ नये, असे अनिवार्य करण्यात आले आहे. तरीही वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया समिती प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांना एक महिन्याची मुदत देऊन प्रक्रियेत सामावून घेत आहे. हा प्रकार खऱ्या आदिवासींवर अन्याय करणारा असल्याने त्याची कुणकूण लागताच विदर्भ ट्रायबल डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप कुमरे, डॉ. आशिष कोरेती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी अधिष्ठाता कार्यालयाचे मुख्य द्वारच आतून लावून घेतले. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज