अ‍ॅपशहर

मुरलीमनोहर यांनी घेतली सरसंघचालकांची भेट

केंद्र सरकारचे दोन वर्षे आणि उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा केली.

Maharashtra Times 4 Jun 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, नागपूर केंद्र सरकारचे दोन वर्षे आणि उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन चर्चा केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur murli manohar joshi meets bhagvat
मुरलीमनोहर यांनी घेतली सरसंघचालकांची भेट


संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गात बौद्धिकसाठी जोशी यांचे गुरुवारी रात्री येथे आगमन झाले. त्यांनी शुक्रवारी सकाळी संघ मुख्यालयात सरसंघचालक भागवत यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यात सरकारचे दोन वर्षांचे काम आणि उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीवर भर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्यावेळी अनेक नेत्यांना डावलण्यात आले. उत्तरप्रदेशमध्येही तशीच स्थिती आहे. जुन्या नेत्यांना तसेच यापूर्वी निवडणुकीत सक्रिय राहिलेल्यांचा विचार व्हावा, अशी मागणी भाजपमध्ये जोर धरत आहे. त्यामुळे जोशी-भागवत चर्चेनंतर या मागणीला बळ मिळू शकते, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. जोशी आणि भागवत यांच्यात सुमारे २०​ मिनिटे चर्चा चालली. आधी जोशी रेशीमबागेतील स्मृती मंदिरात गेले. त्यानंतर लगेच भागवतही रेशीमबागेत पोहोचले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज