अ‍ॅपशहर

माओवाद्यांकडून फादरची हत्या

पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी एका चर्चच्या फादरची हत्या केली. ही खळबळजनक घटना आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या चिंतूर लच्चीगुडा येथे शनिवारी घडली.उईके मारय्या, असे त्यांचे नाव असून ते लच्चीगुडाच्या चर्चमध्ये फादर होते.

Maharashtra Times 31 Jul 2016, 3:56 am
म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur naxal hacked father
माओवाद्यांकडून फादरची हत्या


पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी एका चर्चच्या फादरची हत्या केली. ही खळबळजनक घटना आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या चिंतूर लच्चीगुडा येथे शनिवारी घडली.

उईके मारय्या, असे त्यांचे नाव असून ते लच्चीगुडाच्या चर्चमध्ये फादर होते. उईके यांच्या घरी सुमारे ५०वर माओवादी आले. त्यांना गावातील चौकात नेऊन बेदम मारहाण करीत तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या केली. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून ही हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. उईके हे मूळचे छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील रहिवासी होते. आजवर माओवाद्यांनी पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून शेकडो जणांना ठार मारले आहे. पण, कुठल्याही फादरची माओवाद्यांकडून हत्या करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.

एक जवान शहीद

छत्तीसगडमध्ये शहीद सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी; शनिवारी माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद तर एक जखमी झाला आहे. सुकमा जिल्ह्यातील कोंटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात जहाल माओवादी हिडमाच्या हालचाली असल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे कोब्रा बटालियनच्या जवानांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. यातच दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात एक जवान शहीद तर एक जखमी झाला. जखमी जवानावर रायपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज