अ‍ॅपशहर

आरोग्यसेवा सुधारासाठी अहवाल द्या

मनपातर्फे संचालित दवाखाने व आरोग्य केंद्रात शहरवासियांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी मनपा प्रयत्न करीत आहे. सुधारसेवेसंदर्भात लागणाऱ्या बाबींचा आरोग्य केंद्रनिहाय अहवाल केंद्रप्रमुखांनी आरोग्य समितीकडे सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

Maharashtra Times 11 Jul 2017, 4:00 am
म.टा. प्रतिनिधी, नागपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur nmc demands report for health service
आरोग्यसेवा सुधारासाठी अहवाल द्या


मनपातर्फे संचालित दवाखाने व आरोग्य केंद्रात शहरवासियांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी मनपा प्रयत्न करीत आहे. सुधारसेवेसंदर्भात लागणाऱ्या बाबींचा आरोग्य केंद्रनिहाय अहवाल केंद्रप्रमुखांनी आरोग्य समितीकडे सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

नागपूर महापालिका संचालित दवाखाने व आरोग्य केंद्रात पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा व इमारतीच्या सुव्यवस्थेचा आढावा सोमवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात घेण्यात आला. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, माजी महापौर प्रवीण दटके, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले, अपर आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दीकी, आरोग्य अधिकारी (दवाखाने) अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ. सुनील घुरडे, नोडल ऑफिसर (मातामृत्यू) डॉ. बकुल पांडे, डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. स्नेहल पंड‌ित, डॉ. भावना सोनकुसरे, डॉ. शिलू चिमूरकर, डॉ. शिल्पा जिचकार, डॉ. संगीता खंडाईत, डॉ. श्यामसुंदर शिंदे, डॉ. सुलभा शेंडे यांची उपस्थिती होती. महापौर म्हणाल्या, ‘शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी असा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रावर कार्यरत डॉक्टर व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा देताना अडचणी येतात. यासाठी आरोग्य केंद्रात आवश्यक असलेली यंत्र सामुग्री, मनुष्यबळ आदी गरजेच्या बाबींचा केंद्रनिहाय सविस्तर अहवाल आरोग्य समितीपुढे सादर करावा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज