अ‍ॅपशहर

पोलीस म्हणाले, विक्रम कुठे आहेस? चलान फाडणार नाही!

अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि अवघा देश शोकसागरात बुडाला. पण सोमवारी विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आणि पुन्हा आनंदाला उधाण आलं. त्याचवेळी नागपूर पोलिसांनी विक्रम लँडरबाबत असं काही ट्विट केलं की साऱ्या देशात हास्याचे कारंजे उडाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Sep 2019, 4:15 pm
नागपूर: इस्रोच्या चांद्रयान २ मोहिमेतील विक्रम लँडर चंद्रावर कधी उतरेल याची उत्सुकता देशवासियांमध्ये होती. पण अवघ्या २.१ किलोमीटरवर असताना विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि अवघा देश शोकसागरात बुडाला. पण सोमवारी विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं आणि पुन्हा आनंदाला उधाण आलं. त्याचवेळी नागपूर पोलिसांनी विक्रम लँडरबाबत असं काही ट्विट केलं की साऱ्या देशात हास्याचे कारंजे उडाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur police tweets chandrayaan 2 vikram lander asks to respond to isro we are not going to challan you for breaking the signals
पोलीस म्हणाले, विक्रम कुठे आहेस? चलान फाडणार नाही!


'प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलंस तरी आम्ही चलान फाडणार नाही,' असं ट्विट नागपूर शहर पोलिसांनी केलं. पोलिसांच्या सेन्स ऑफ ह्यूमरचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. 'नागपूर पोलीस अगदी बरोबर बोलले. विक्रमकडून १३३ कोटी भारतीयांना आशा आहे. नागपूर पोलिसांचं ट्विट अफलातून आहे,' असं एका यूजरनं म्हटलं आहे. 'मला माहीत आहे की नागपूर पोलीस सध्या चंद्रावरच आहेत,' असं अन्य एका यूजरनं म्हटलं. तर ग्रेट सेन्स ऑफ ह्यूमर अशा शब्दांत एका युजरनं नागपूर पोलिसांचं कौतुक केलं.



सध्या देशभरात दोन गोष्टींची चर्चा आहे. भारताची चांद्रयान २ मोहीम आणि नव्या मोटार वाहन कायद्याची. नव्या मोटार वाहन कायद्यांनुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास जबर दंड वसूल केला जात आहे. त्यावर सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. त्यात आता नागपूर पोलिसांची चांद्रयान २च्या विक्रम लँडरसंबंधी हे अफलातून ट्विट केल्यानं देशभरात 'खळखळाट' सुरू झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज