अ‍ॅपशहर

लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन

भोसले घराण्यातील काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत तेजसिंगराव व राणी चित्रलेखा भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र राजे लक्ष्मणसिंग यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी दुपारी निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते.

Maharashtra Times 20 Aug 2017, 4:00 am
नागपूर : भोसले घराण्यातील काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत तेजसिंगराव व राणी चित्रलेखा भोसले यांचे ज्येष्ठ पुत्र राजे लक्ष्मणसिंग यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी दुपारी निधन झाले. ते ५१ वर्षांचे होते.राजे लक्ष्मणसिंग यांना दुपारी ३ वाजताच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी छातीत दुखू लागल्यानंतर त्यांनी नोकरांना आवाज देण्यापूर्वीच ते खाली कोसळले. घरातील नोकरांनी त्यांना लगेच धावपळ करून वर्धा रोडवरील हॉस्पिटलला नेले. परंतु, उपचारापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अकाली निधनाने ​भोसले कुटुंबीयांसह त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा पहाड कोसळला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur raje lakshmansing bhosle passes away
लक्ष्मणसिंग भोसले यांचे निधन


लक्ष्मणसिंग यांच्यापश्चात पत्नी इंदिरा राजे भोसले, मुली अग्रेजा राजे भोसले व संयुक्ता राजे भोसले, बंधू राजे मानसिंग तसेच, तीन बहिणी व मोठा आप्तपरिवार आहे. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे ते जावई होते. मस्कॉट होंडा कंपनीचे ते संचालक होते. महाल येथील राजवाड्यावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यांची अंत्ययात्रा आज, रविवारी दुपारी २ वाजता निघून त्यांच्या पार्थिवावर काशीबाई राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज