अ‍ॅपशहर

ऑनलाइन अर्जांसाठी धावपळ सुरू

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या केंद्रांमधून पालकांनी अर्ज भरण्यास प्रारंभ केला आहे. हे अर्ज भरण्यासाठी आरटीईच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Maharashtra Times 10 Feb 2017, 4:00 am
नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यास गुरुवारपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या केंद्रांमधून पालकांनी अर्ज भरण्यास प्रारंभ केला आहे. हे अर्ज भरण्यासाठी आरटीईच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur rti issue in nagpur district
ऑनलाइन अर्जांसाठी धावपळ सुरू


आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये २५ टक्के जागा राखून ठेवण्यात येतात. शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना या जागांवर प्रवेश देण्यात येतो. यासाठी राज्यस्तरावरून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सुरुवातीच्या टप्प्यात शाळांची नोंदणी करण्यात आली. त्यानंतर आता ९ फेब्रुवारीपासून ते २५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येतील. गुरुवारी दुपारी एक वाजल्यापासून हे अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करताना अडचण येऊ नये म्हणून जिल्ह्यात विविध ठिकाणी मदत केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या केंद्रावर अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले जाईल तसेच अर्ज भरूनही दिले जातील. उपलब्ध जागांसाठी बालकांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. शाळेत बालकाची निवड झाल्यास एसएमएसद्वारे पालकांना माहिती दिली जाणार आहे. संकेतस्थळावर मदत आणि मार्गदर्शन केंद्रांची यादी देण्यात आली आह. जास्तीत जास्त पालकांनी या प्र‌क्रियेकरिता अर्ज सादर करावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.



आरटीईच्या उपलब्ध जागा

■ एकूण शाळा- ६२२

■ एकूण जागा- ७१०२

■ इयत्ता पहिली- ६७१०

■ पूर्व प्राथमिक- ३९२


आवश्यक कागदपत्रे अशी...

रहिवासी पुरावा- आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्रे, विविध देयके, वाहन चालविण्याचा परवाना आदी

वडिलांचे जात प्रमाणपत्र

गरज असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र

बालकाच्या जन्माचा दाखला

बालकाचे रंगीत छायाचित्र

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज