अ‍ॅपशहर

वाघिणीचा संशयास्पद मृत्यू

पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारीजवळ शनिवारी एक वाघीण संशयास्पद मृतावस्थेत आढळली. त्यामुळे वन्यजीव विभागात खळबळ उडाली असून सतत वाघांच्या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता सतावत आहे.

Maharashtra Times 15 Jan 2017, 4:00 am
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारीजवळ शनिवारी एक वाघीण संशयास्पद मृतावस्थेत आढळली. त्यामुळे वन्यजीव विभागात खळबळ उडाली असून सतत वाघांच्या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता सतावत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur tigress found dead in pench
वाघिणीचा संशयास्पद मृत्यू


काही दिवसांपूर्वीच बिबट्याची शिकार आणि शुक्रवारी वाघीण तसेच दोन सांबरांची जिवंत विजेच्या ताराने शिकार करण्यात आली. ही घटना वनविभागातील प्रादेशिक अंतर्गत घडली होती. तर, आता व्याघ्र प्रकल्पातील कोअर भागातच वाघीण मृतावस्थेत आढळली. मात्र, वाघिणीची शिकार झाली असेल, असे कोणतेही पुरावे वनविभागाला मिळालेले नाही. सावनेर तालुक्यातील खापा वनविभागांतर्गत येणाऱ्या खुबाळा राऊंडमधील टेंबुरडोह बीटमध्ये ही घटना घडली. अलीकडच्या काळात जिवंत विजेच्या तारात अडकून वन्यप्राण्यांची शिकार होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता जिवंत विजेच्या तारांच्या मदतीने वन्यप्राण्यांची शिकार केली जात आहे. वाघिणीचे वय सुमारे १४ असल्याची माहिती आहे. पण, शिकार झाली नसल्याचा दावा वनविभागाने केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज