अ‍ॅपशहर

आज जाळणार भाजपचा जाहीरनामा

नागपूरः आम्ही छोट्या राज्यांच्या बाजूने असून आमचे वेगळ्या विदर्भाला समर्थन आहे, असे सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अद्याप वेगळ्या विदर्भाकरिता पाऊल उचलेले नाही. त्यामुळे भाजपने विदर्भवासियांसोबत विश्वासघात केला आहे.

Maharashtra Times 1 May 2016, 4:30 am
नागपूरः आम्ही छोट्या राज्यांच्या बाजूने असून आमचे वेगळ्या विदर्भाला समर्थन आहे, असे सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाने अद्याप वेगळ्या विदर्भाकरिता पाऊल उचलेले नाही. त्यामुळे भाजपने विदर्भवासियांसोबत विश्वासघात केला आहे. २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये वेगळ्या विदर्भाकरिता भूमिका घेऊ, असे ठोस आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले होते. परंतु, आज ते त्याबद्दल काहीच बोलत नाही. त्यामुळे २०१४चा भाजपचा जाहीरनामा जाळण्याचे आम्ही ठरविले आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने रविवार, १ मे रोजी व्हरायटी चौकात गांधी पुतळा येथे दुपारी १२.३० वाजता भाजपचा जाहीरनामा जाळण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur videarbha activists to hold demos today
आज जाळणार भाजपचा जाहीरनामा


संविधान चौकात आज धरणे आंदोलन

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीतर्फे विदर्भ राज्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संविधान चौकात सकाळी १० ते ६ वाजतापर्यंत हे आंदोलन केले जाणार आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांच्या मार्गदर्शनात आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अहमद कादर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन होईल. सिद्धार्थ पाटील, किशोर गजभिये, विदर्भ सचिव छाया कुरडकर, जिल्हा प्रभारी हरिकिसन हटवार, ईश्वर कडबे आदी या आंदोलनात सहभागी होतील. यानंतर पक्षातर्फे संपूर्ण मे महिनाभर विदर्भात स्वतंत्र विदर्भासाठी पदयात्रा काढण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज