अ‍ॅपशहर

बाबांचे स्वप्न पूर्ण करायचेय...

नागपूर : सुखवस्तू कुटुंबांमध्ये ‘आयत्या’ अविर्भावात जगणारी शेकडो मुले आपण पाहतो. सगळे सुख पायात लोळण घालत असतानाही आपले कर्तव्य सिद्ध न करू शकणारे तक्रारींचा पाढा वाचत रडत बसतात. मात्र, ‘सोय’ हा शब्द चवीलाही ठाऊक नसताना जिद्दीच्या बळावर गैरसोयीवर मात करता येते, हे नवा नकाशा भागातल्या प्रशित नितनवरेने दाखवून दिले आहे.

Maharashtra Times 2 Jul 2017, 4:30 am
नागपूर : सुखवस्तू कुटुंबांमध्ये ‘आयत्या’ अविर्भावात जगणारी शेकडो मुले आपण पाहतो. सगळे सुख पायात लोळण घालत असतानाही आपले कर्तव्य सिद्ध न करू शकणारे तक्रारींचा पाढा वाचत रडत बसतात. मात्र, ‘सोय’ हा शब्द चवीलाही ठाऊक नसताना जिद्दीच्या बळावर गैरसोयीवर मात करता येते, हे नवा नकाशा भागातल्या प्रशित नितनवरेने दाखवून दिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nagpur want to fulfil fathers dreams says prashit nitnaware
बाबांचे स्वप्न पूर्ण करायचेय...


परिस्थितीने पायात साखळदंडची शृंखला बांधूनही खुरडत जगण्यापेक्षा प्रशितने लढवय्या बाणा ठेवत प्रयत्नांना कष्टाची जोड दिली व दहावीत ७९ टक्क्यांचा पल्ला गाठला. आता विज्ञान शाखा निवडून वडिलांच्या राहून गेलेल्या स्पप्नांना पूर्ण करण्याचा चंग त्याने बांधला आहे. त्यासाठी त्याने पॉलिटेक्निकला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्नदेखील सुरू केले आहेत.

कमाल चौकाजवळील नवा नकाशा परिसरात राहणाऱ्या प्रशितचे घर तसे भाड्याचे. शेजारचे हक्काचे घर पडल्याने हे कुटुंब भाड्याचे घर घेऊन येथे राहते. प्रशितच्या घरात कमावणारा एकच. खाणारी तोंडे सहा. त्यातही आजी वयोमानानुसार थकलेली. तर आई आजारपणामुळे अंथरुणाला खिळलेली. हातावर आणून पानावर खाणारे कुटुंब. हक्काचे घर तर दूरच नोकरीचे देखील वांधे. सगळीकडेच परिस्थिती भीषण. त्यामुळे प्रशितनेदेखील आठवीपासूनच कामाची सवय लावून घेतली.

वडिलांना काही तरी हातभार लागावा साठी तो रोज सकाळी घरोघरी वर्तमानपत्र विकून भविष्याला आकार देऊ इच्छितो. कामठीच्या केंद्रीय विद्यालयातून शिक्षणाचे धडे घेतलेल्या प्रशितमध्ये मुळातच लष्कराप्रमाणे लढवय्यी जिद्द निर्माण केली आहे. त्याची आई बीएससीपर्यंत शिकली आहे. वडील प्रशांत यांनादेखील विज्ञान शाखेत करिअर करण्याची इच्छा होती. मात्र, परिस्थितीमुळे ते शिकू शकले नाहीत. मात्र, निदान आपल्या मुलांनी तरी शिक्षण घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे. वडिलांचे राहून गेलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशितदेखील त्या दिशेने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्याला गरज आहे, ती दातृत्वाची भावना जागी असलेल्या संवेदनशील मनांची. त्याच्या प्रयत्नांना ही जोड मिळाली तर निश्चितच तो यशाला गवसणी घातल्याशिवाय राहणार नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज