अ‍ॅपशहर

रेल्वेस्थानकावर 'ओला'ला परवानगी

रेल्वेस्थानकावरून प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी आता ओला टॅक्सीला मिळाली आहे. रेल्वेस्थानकावर आजघडीस प्रीपेड ऑटो सेवा उपलब्ध आहे.

Maharashtra Times 18 Jan 2018, 7:32 am
नागपूर : रेल्वेस्थानकावरून प्रवाशांची ने-आण करण्याची परवानगी आता ओला टॅक्सीला मिळाली आहे. रेल्वेस्थानकावर आजघडीस प्रीपेड ऑटो सेवा उपलब्ध आहे. मात्र, उबेर किंवा ओला टॅक्सीच्या सेवेला मर्यादा आहेत. या कारने प्रवाशांना रेल्वेस्थानकावर जाता येते. मात्र, स्थानकावरून प्रवासी घेऊन जायला ओला किंवा उबेरचालक नकार देतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ola service allowed on railway station
रेल्वेस्थानकावर 'ओला'ला परवानगी


एखाद्या प्रवाशाने स्थानकावरून अशी टॅक्सी बुक केल्यास त्यांना पुढच्या चौकात बोलवले जाते. वास्तविक, कायद्यानुसार त्यांना स्थानकावरून प्रवासी घेण्यास बंदी नाही. मात्र, ऑटोचालक व या टॅक्सीसेवा यांच्यातील वादामुळे ते स्टेशनवरून प्रवासी नेत नव्हते. मध्यंतरी लोहमार्ग पोलिसांनीही समन्वयासाठी प्रयत्न केले होते. मात्र, आता रेल्वे प्रशासनानेच प्रवाशांची ने-आण करण्यासाठी ओला कंपनीशी करार केला आहे. येत्या दहा दिवसांत ओलाची सेवा रेल्वेस्थानकावरून सुरू होणार आहे. ही सेवा प्रवाशांना मिळावी, यासाठी रेल्वेने निविदा काढल्या होत्या. यात हे कंत्राट ओला कंपनीला मिळाले आहे. हे कंत्राट वर्षभराचे असून, येत्या दहा दिवसांत कंपनीला ३५ लाख रुपये रेल्वेकडे भरायचे आहेत. रेल्वे स्थानकावर बुलंद इंजिनसमोरची जागा ओला टॅक्सीसाठी देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज