अ‍ॅपशहर

तब्बल १६ हजार मोरपिसे जप्त

एकाला अटक; आरपीएफची कारवाईमटा...

Maharashtra Times 14 Sep 2018, 4:00 am

एकाला अटक; आरपीएफची कारवाई

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

आग्रा येथून मोराची पिसे आणून त्याची नागपुरात विक्री करणाऱ्यास आरपीएफने गुरुवारी रेल्वेस्थानक परिसरात अटक केली. राजीवसिंह उदयसिंह (२६, इटावा, उत्तर प्रदेश) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याजवळून १६ हजार मोरपिसे जप्त करण्यात आली. ही कारवाई सकाळी ८ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

राजीवसिंहने आग्रा येथून १६ हजार मोरपिसे ३ हजार २०० रुपयांत खरेदी केली होती. सणासुदीच्या काळात अनेकजण मोरपिसे घेतात. त्यामुळे तो नागपुरात विक्रीसाठी आला होता. दिल्ली येथील वन्यजीव कार्यकर्ते दीपककुमार बलजितसिंग यांना मोरपिसांसह तरुण दिसताच त्यांनी आरपीएफ ठाण्यात उपनिरीक्षक राजेश औटकर यांना माहिती दिली. त्यामुळे हेडकॉन्स्टेबल शेषराव पाटील हे आरोपीला ठाण्यात घेऊन आले. आरोपी आणि मोरपिसे वनविभागाच्या सुपुर्द करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज