अ‍ॅपशहर

मरामजोब-कोसबी जंगलात पोलिस-नक्षल चकमक

देवरी-चिचगडच्या मध्यंतरी असलेल्या मरामजोब-कोसबीजवळच्या घनदाट जंगलात पोलिस-माओवाद्यांची चकमक झाली ही घटना गुरुवारी सकाळी ९४५ वाजताच्या सुमारास घडली...

Maharashtra Times 21 Sep 2018, 4:00 am

मरामजोब-कोसबी जंगलात पोलिस-माओवाद्यांची चकमक

गोंदिया : देवरी-चिचगडच्या मध्यंतरी असलेल्या मरामजोब-कोसबीजवळच्या घनदाट जंगलात पोलिस-माओवाद्यांची चकमक झाली. ही घटना गुरुवारी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. सी-६० जवान व पोलिसांचा वाढता दबाव पाहून ४० ते ५०च्या संख्येत असलेल्या सशस्त्र माओवाद्यांनी जंगलात पळ काढला. या वेळी पोलिसांनी माओवाद्यांचे साहित्य घटनास्थळावरून जप्त केले आहे.

चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत येणाèऱ्या मरामजोब-कोसबी जंगलात पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांच्या नेतृत्वात पोलिस पार्टी व सी-६० जवान असे एकूण ४० अधिकारी व कर्मचारी सकाळी आठ वाजतापासून माओवादीविरोधी अभियान राबवित होते. ९.४५ वाजताच्या सुमारास चिचगडपासून १४ किलोमीटरवर असलेल्या मरामजोब-कोसबी जंगल परिसरात सीपीआय माओवादी संघटनेचे ४० ते ५० सशस्त्र माओवादी गणवेशामध्ये आढळले. त्यांच्याजवळ शस्त्रे होती. पोलिस पार्टीला पाहून जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिस पार्टी मधील अधिकारी व कर्मचाèऱ्यांनी माओवाद्यांच्या गोळीबारास प्रतिउत्तर म्हणून गोळीबार केला. दरम्यान, पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवादी साहित्य सोडून जंगलात पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी राबविलेल्या शोध मोहिमेत एक प्रेशर कुकर, बाँम्ब, परिपत्रके व नक्षल साहित्य मिळून आले. या घटनेनंतर परिसरात सायंकाळी उशिरापर्यंत कोम्बींग ऑपरेशन सुरू होते. जिल्हा पोलिस दल माओवाद्यांचा कसून शोध घेत आहेत.

-----------------

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज