अ‍ॅपशहर

विदर्भातील गुंड प्रवीण दिवटेचा निर्घृण खून

यवतमाळमधील गुंड आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक प्रवीण दिवटेची आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. गुंठा राऊत खून खटल्यातून सुटून नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या दिवटेच्या निर्घृण हत्येनं यवतमाळसह विदर्भातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Times 27 Aug 2016, 4:13 pm
मटा ऑनलाइन वृत्त । यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pravin divte murdered in yavatmal
विदर्भातील गुंड प्रवीण दिवटेचा निर्घृण खून


यवतमाळमधील गुंड आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक प्रवीण दिवटेची आज सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. गुंठा राऊत खून खटल्यातून सुटून नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या दिवटेच्या निर्घृण हत्येनं यवतमाळसह विदर्भातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याच्या खुनामागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

आज सकाळी साडेसातच्या सुमारास सात-आठ अज्ञात हल्लेखोर प्रवीण दिवटेच्या घरात शिरले आणि त्यांनी त्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. त्यानंतर काही कळायच्या आतच त्याच्या छातीत चार गोळ्या झाडल्या आणि तलवार, खंजीराने त्याच्यावर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दिवटेला वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

प्रवीण दिवटेवरील हल्ल्याची बातमी शहरभर पसरली आणि काही मिनिटांतच चार ते पाच हजार तरूण त्याच्या घराबाहेर जमा झाले. दिवटेची हत्या कुणी केली असेल, याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. हा खून टोळीयुद्धातून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज असून त्यादृष्टीने त्यांनी तपास सुरू केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज