अ‍ॅपशहर

कोराडीतील अड्ड्यावर छापा

कोराडीतील अड्ड्यावर छापाकोराडीतील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलजवळ सुरू असलेल्या सट्टापट्टीच्या अड्ड्यावर 'रिजन स्कॉड'ने मंगळवारी छापा टाकून तिघांना ...

Maharashtra Times 20 Jun 2018, 4:00 am

कोराडीतील अड्ड्यावर छापा

कोराडीतील स्वामी विवेकानंद हॉस्पिटलजवळ सुरू असलेल्या सट्टापट्टीच्या अड्ड्यावर 'रिजन स्कॉड'ने मंगळवारी छापा टाकून तिघांना अटक केली. नरेश छन्नूलाल मानकर रा.राणी दुर्गावतीनगर, आदर्श सुनील सुरवाडे रा. फुलेनगर व अमित अशोक नवघरे रा.कोराडी,अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हॉस्पिटलजवळ तिघे सट्टापट्टीची खायवडी करीत असल्याची माहिती रिजन स्कॉडला मिळाली. अतिरिक्त पोलिस आयुक्त श्यामराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ए.पी.आत्राम, सहायक पोलिस उपनिरीक्षक मधुकर शिर्के,हेडकॉन्स्टेबल धमेंद्र, चंदू ठाकरे, शरद चांभारे व अमित सातपुते यांनी छापा टाकून तिघांना अटक केली.पोलिसांनी सट्टापट्टीसह सहा हजार रुपये जप्त केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज