अ‍ॅपशहर

क्यूनेटकडून ९३ लाखांची फसवणूक

अल्पावधीत कोट्याधीश बनविण्याचे आमिष दाखवून देशभरातील गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या क्यूनेट कंपनीने नागपुरातील १२ गुंतवणूकदारांची ९३ लाखांनी फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपासानंतर या प्रकरणीत क्यूनेटच्या संचालकांविरुद्ध सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Times 31 Jan 2018, 2:55 pm
नागपूर: अल्पावधीत कोट्याधीश बनविण्याचे आमिष दाखवून देशभरातील गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या क्यूनेट कंपनीने नागपुरातील १२ गुंतवणूकदारांची ९३ लाखांनी फसवणूक केली. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपासानंतर या प्रकरणीत क्यूनेटच्या संचालकांविरुद्ध सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. कविता खोंड, मृणाल धार्मिक, आशिष लुनावत, प्रशांत धार्मिक, किशोर भंडारकर, मंगेश चिकारे, ऋतुजा चिकारे, प्रशांत डाखोडे, प्रज्ञा डाखोडे व श्रीकांत रामटेके,अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कंपनीच्या संचालकांविरुद्ध देशभरात आतापर्यंत १२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rs 98 lakh cheating plus fast from quebec
क्यूनेटकडून ९३ लाखांची फसवणूक


आंचल एस. लाल (४९ रा.स्वावलंबीनगर) यांनाही संचालकांनी जाळ्यात ओढले. क्यूनेट कंपनी आंतरराष्ट्रीय आहे. रिसॉर्ट, ऑनलाइन शॉपिंग, कॉर्पोरेट फायनान्स, टेलीकम्युनिकेशन, ई कॉमर्स आदींमध्ये कंपनीची गुंतवणूक आहे. या कंपनीत गुंतवणूक केल्यास अल्पावधीत तुम्ही कोट्यधीश व्हाल. याशिवाय सदस्यत्वही मिळेल. अन्य गुंतवणूकदारांना कंपनीत गुंतवणूक कण्यास सांगितल्यास प्रत्येकी ३० हजार रुपये व कमिशन मिळेल,असे आमिष दाखविले. त्याला आंचल व अन्य ११ गुंतवणूकदार बळी पडले.१२ जणांनी कंपनीत ९३ लाखांची गुंतवणूक केली. मात्र त्यांना लाभ मिळाला नाही. आंचल लाल यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली. उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम.डी. शेख यांनी तपास करून गुन्हा दाखल केला. लवकरच आरोपींच्या घरावर छापे टाकण्यात येऊन त्यांना अटक करण्यात येईल,असे पोलिसांनी सांगितले.

बीट क्वॉइनवरून फसवणूक

बीट क्वॉइन मशीन खरेदी करून लाखो रुपयांचा फायदा होण्याचे आमिष दाखवून अमन सुरेंद्र चोरपगार व त्याची मामी सपना इंगळे यांची आठ लाख ७२ हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गोवा येथील रुफूस मार्क जोन्स जेम्स गोनसाल्विस (१९) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

विद्यार्थिनीच्या मोबाइलवर

अश्लील मॅसेज

नागपूर, सुमित साळुंखे याने १७ वर्षीय विद्यार्थिनीच्या मोबाइलवर अश्लील मॅसेज पाठविला. विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी सुमित साळुंखे याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

युवकाची आत्महत्या

नागपूर,गार्ड लाइन भागात अमितकुमार राजाराम कुशवाह (२८) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तहसील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज