महामेट्रो नागपूरच्या 'रस्ता सुरक्षा अभियाना'ला सोमवारपासून सुरुवात झाली. या अभियानांतर्गत सोमवारी नागपूर विद्यापीठ ग्रंथालय समोरील सिग्नलवर मेट्रो अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. अभियानात सहभागी तरुणांनी 'यमराज' आणि 'चित्रगुप्त' यांची वेषभूशा करून हेल्मेट न घातलेल्या दुचाकी वाहनचालकांना हेल्मेटचा वापर करण्याचा संदेश दिला. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
‘यम’ सांगतोय जीव वाचवा!
महामेट्रो नागपूरच्या 'रस्ता सुरक्षा अभियाना'ला सोमवारपासून सुरुवात झाली...
Maharashtra Times 21 Aug 2018, 4:00 am