अ‍ॅपशहर

चिमुकल्यांनी लिहिले चक्क ‘बापूं’ना पत्र

प्रिय बापू…. शाळेतील पुस्तकातूनच तुमची ओळख झाली. जीवन कसे जगावे याची शिकवण देणाऱ्या तुमच्या कथाही खूप खूप ऐकल्या. स्वच्छतेचा तुम्ही दिलेला मंत्र आम्हाला शिकवल्या जातो. पण, त्याचे पालन फारसे होताना दिसत नाही. पण बापू, आम्ही नाही कचरा करणार…. आपली पृथ्वी अशीच सुंदर राहावी, यासाठी आम्ही शपथ घेतली आहे,… अशा शब्दांत चिमुकल्यांनी चक्क बापूंनाच पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्र टाइम्स 6 Dec 2022, 5:53 am
नागपूर: प्रिय बापू…. शाळेतील पुस्तकातूनच तुमची ओळख झाली. जीवन कसे जगावे याची शिकवण देणाऱ्या तुमच्या कथाही खूप खूप ऐकल्या. स्वच्छतेचा तुम्ही दिलेला मंत्र आम्हाला शिकवल्या जातो. पण, त्याचे पालन फारसे होताना दिसत नाही. पण बापू, आम्ही नाही कचरा करणार…. आपली पृथ्वी अशीच सुंदर राहावी, यासाठी आम्ही शपथ घेतली आहे,… अशा शब्दांत चिमुकल्यांनी चक्क बापूंनाच पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम student letter ot bappu
चिमुकल्यांनी लिहिले चक्क ‘बापूं’ना पत्र


निमित्त होते वायुसेनानगर येथील केंद्रीय विद्यालयाच्यावतीने आयोजित अनोख्या स्पर्धेचे. विद्यार्थांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाच्यावतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून वायुसेनानगर येथील केंद्रीय विद्यालयाच्यावतीने 'बापू को पत्र' या अनोख्या संकल्पनेवर आधारित स्पर्धा अलीकडेच घेण्यात आली.

स्वच्छतेचे महत्त्व आणि त्यासाठी घेतलेला पुढाकार, अशी माहिती विद्यार्थ्यांनी बापुंना लिहिलेल्या पत्रात लिहिणे अपेक्षित होते. वर्ग २ ते ५ आणि वर्ग ६ ते १२ असे दोन गट तयार करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रत्येक केंद्रीय विद्यालयातून निवडक पत्र मुंबईतील केंद्रीय विद्यालय संघटन यांना पाठविण्यात येईल. शाळेचे प्राचार्य अरविंद कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली. एस. मिश्रा, ममता सासन, कंचन सक्सेना या शिक्षकांनी या स्पर्धेचे आयोजन केले. शब्दिता मिश्रा, स्वयम हांडे, प्रीत, आरोही शेंडे, वैष्णवी, विराट बंटे, आदिती बांबोडे, तेजस या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. मोठ्यांनाही शिकवण मिळेल असेच या चिमुकल्यांनी या पत्रात मांडले आहे.

बापू आम्ही शपथ घेतो….!

कचरा डस्टबिनमध्येच टाकणार


बापू, दात खराब होतात म्हणून मी जास्त चॉकलेट खात नाही. दातांची जशी काळजी घेतो तशीच मी माझ्या पृथ्वीची पण घेणार. पृथ्वी प्रदूषित नाही होऊ देणार. चॉकलेट खाल्ल्यानंतर कचरा डस्टबिनमध्ये टाकणार.

पृथ्वीला सुंदर ठेऊ

मम्मीला त्रास होऊ नये म्हणून घरात कचरा करत नाही. पृथ्वीलाही आपली धरती माता असले म्हटले जाते. त्यामुळे पृथ्वी स्वच्छ राहावी, यासाठी मी कचरा नाही करणार.

गायीला प्लास्टिक नाही खाऊ देणार

गायीला आपली माता आहे, असे माझ्या आई-बाबांनी आणि शिक्षकांनी सांगितले. पण, गाय प्लास्टिक का खाते, तिचे पोट नाही दुखत का? असे प्रश्न उपस्थित करत चिमुकल्यांनी यापुढे गायीला प्लास्टिक नाही खाऊ देणार, असे सांगत प्लास्टिक न वापरण्याचीही शपथ घेतली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज