अ‍ॅपशहर

टी-१वाघिणीच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात

टी-१ वाघीण ठार झाल्यानंतर वनविभागाचे पथक गेल्या दीड महिन्यापासून तिच्या बछड्यांचा शोध घेत असले तरी त्यांना त्यात यश मिळाले नव्हते. मात्र, गुरुवारी सकाळपासून सुरू झालेली मोहीम अंतिम टप्प्यात आली असून पुढील एक-दोन दिवसांत या बछड्यांना जेरबंद करून रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात येईल

30 21 Dec 2018, 3:45 am
म.टा. वृत्तसेवा, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम search operation of two cubs of t1 tigress in the last phase
टी-१वाघिणीच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्याची मोहीम अंतिम टप्प्यात


टी-१ वाघीण ठार झाल्यानंतर वनविभागाचे पथक गेल्या दीड महिन्यापासून तिच्या बछड्यांचा शोध घेत असले तरी त्यांना त्यात यश मिळाले नव्हते. मात्र, गुरुवारी सकाळपासून सुरू झालेली मोहीम अंतिम टप्प्यात आली असून पुढील एक-दोन दिवसांत या बछड्यांना जेरबंद करून रेस्क्यू सेंटरमध्ये पाठविण्यात येईल, असा विश्वास वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी दिवसभर या बछड्यांचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. सकाळी ५ वाजतापासून पुन्हा मोहीम सुरू होणार आहे.

या मोहिमेत मध्य प्रदेशातील कान्हा अभयारण्यातून शिवा, हिमालय, पवनपुत्र व चंचलकली या चार हत्तीसह सहा पशुवैद्यकीय अधिकारी तसेच वनकर्मचारी सहभागी झाले आहेत. लोणी व अंजीपरिसरात वनविभागाने लावलेल्या ११० कॅमेरांत व ५४ प्रेशर इम्प्रेशर पॅड लावण्यात आले आहेत. बुधवारी अंजी परिसरात हे बछडे आढळून आले होते. ज्या परिसरात या बछड्यांचे वास्तव्य आहे, त्या ८० एकर परिसरातून या बछड्यांना बाहेर पडता येऊ नये म्हणून तारेचे कंपाऊंड करण्यात आले आहे. या परिसरात गावकऱ्यांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोहीम सुरू करण्यापूर्वी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक प्रदीप राहुरकर पांढरकवडा येथील उपवनसंरक्षक के. अभरणा यांच्यासह वनाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सराटी येथील बेस कॅम्पवर घेण्यात आली. आज प्रधान मुख्य वनसंरक्षक ए. के. मिश्रा, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी मोहीम सुरू असलेल्या परिसराला भेट दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज