अ‍ॅपशहर

बेंगळुरुनजीक अपघातात खामगावचे सात ठार

बेंगळुरू येथील वेल्लमा शहरानजीक झालेल्या कार अपघातात खामगाव येथील सात जण ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली...

महाराष्ट्र टाइम्स 7 May 2019, 12:11 pm
बुलडाणा : बेंगळुरू येथील वेल्लमा शहरानजीक झालेल्या कार अपघातात खामगाव येथील सात जण ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम seven dead in family from khamgaon buldhana district in maharashtra as car rams trailer near ambur on the chennai bengaluru national highway
बेंगळुरुनजीक अपघातात खामगावचे सात ठार


खामगाव येथील मूळचे रहिवासी असलेले मिलिंद नारायण देशमुख हे भुसावळ येथे रेल्वे सुरक्षा दलात हवालदार म्हणून कार्यरत होते. त्यांचा लहान भाऊ राजेश देशमुख हा बेंगळुरू येथील हवसर येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. मुलांसोबत ते आपल्या लहान भावाकडे गेले होते. देशमुख कुटुंबीय सोमवारी दुपारी १ वाजता कार घेऊन फिरायला जात होते. दरम्यान त्यांच्या कारला वेल्लूर जिल्हयातील अंबूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या वेलम्मा जवळ अपघात झाला. यामध्ये मिलिंद नारायण देशमुख (४५), त्यांची पत्नी किरण मिलिंद देशमुख (३५), मुलगा आदित्य (१२) व अजिंक्य (०७) यांच्यासह राजेश नारायण देशमुख (३७), पत्नी सारिका राजेश देशमुख (३१) अशा सहा जणांसह चालक जागीच ठार झाले. या घटनेची माहिती खामगाव येथे मिळताच देशमुख कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज