अ‍ॅपशहर

शरद पवारांचा उद्यापासून नागपूर-शिवनी दौरा; मात्र कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द

Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवस नागपूर-शिवनी दौऱ्यावर आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 31 Mar 2023, 12:47 pm
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या शनिवार, १ एप्रिलपासून दोन दिवसीय नागपूर-शिवनी दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, या दौऱ्यादरम्यान त्यांच्या उपस्थितीत होणारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sharad pawar new.
शरद पवारांचा उद्यापासून नागपूर-शिवनी दौरा; मात्र कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द


नागपूर-शिवनी दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे उद्या, शनिवारी दोन दिवसांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नागपुरात आमगन होईल. यादरम्यान आयोजित मेळाव्याच्या नियोजनाबाबत माजी मंत्री अनिल देशमुख यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सलिल देशमुख आदी उपस्थित होते. मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, गुरुवारी रात्री हा मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आता शरद पवार हे रविवारी सकाळी शिवनीला रवाना होतील.


ग्रामीण राष्ट्रवादीच्यावतीने शिवनी मार्गावर कन्हान चौक, मनसर चौक, देवलापार आदी ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे, असे बाबा गुजर यांनी सांगितले.

महत्वाचे लेख