अ‍ॅपशहर

संजय राऊत स्तब्ध झाले! 'तुम्हीच स्वीकारा जबाबदारी', शिवसैनिकांची साद

विदर्भात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे चार दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. नाराज नेते आणि कार्यकर्त्यांना पक्षासोबत आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहेत. संजय राऊत हे संवाद साधत आहेत.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स 24 Mar 2022, 8:34 am
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्याला संपर्क मंत्री नाही, सर्वांना पदाची चिंता आहे. पक्षाचा भगवा फडकवण्यासाठी आपणच जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी साद शिवसैनिकांनी दिल्याने शिवसेना नेते खासदार संजय राऊत स्तब्ध झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shiv sena mp sanjay raut on nagpur visit
संजय राऊत स्तब्ध झाले! 'तुम्हीच स्वीकारा जबाबदारी', शिवसैनिकांची साद


शिवसंपर्क अभियानांतर्गत खासदार संजय राऊत यांनी ग्रामीणमधील सहाही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा प्रमुखद्वय संदीप इटकेलवार, राजू हरणे, संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी, माजी खासदार प्रकाश जाधव, आमदार आशिष जयस्वाल उपस्थित होते. रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी, रामटेक विधानसभा वगळता उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघात पक्षाला यश आले नाही. विकास निधीचाही मुद्दा कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.

जिल्हा भगवा फडकवण्यासाठी काय करावे, अशी विचारणा राऊत यांनी केली. हा धागा पकडून आपण जबाबदारी स्वीकारावी, अशी भावना काही शिवसैनिकांनी व्यक्त केली. वर्षभरापासून संपर्क मंत्री नाही. खासदार, आमदारांच्या अखत्यारित नसलेली सर्वसामान्यांची कामे त्यांच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडता येतात. पक्ष पातळीवर वरिष्ठांचे सहकार्य अपेक्षित आहे. मुंबईतून बळ मिळाल्यास अधिक जोमाने काम करता येईल. रामटेकसह कामठी आणि सावनेर पक्षासाठी अधिक सोयीचे असल्याकडेही राऊत यांचे लक्ष वेधण्यात आले.

रेशीमबागेतील शिवसेना भवन ग्रामीणचे आहे. शहरातील पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत वादातून कुलूप ठोकण्यात आले असल्याने ग्रामीणमधील शिवसैनिकांसाठी हक्काचे कार्यालय नाही, अशी तक्रार काही पदाधिकाऱ्यांनी केली. यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज