अ‍ॅपशहर

​ यवतमाळ जिल्ह्यात सेना नेत्यांचा वाद उघड

यवतमाळ जिल्हा शिवसेनाप्रमुख या पदावर पराग पिंगळे यांची नियुक्ती मातोश्रीवरून झाल्याच्या काही तासातच त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. या माध्यमातून खासदार भावना गवळी आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यातील वाद उघड झाला आहे.

Maharashtra Times 13 Jul 2017, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivsena leaders conterversy open in yavatmal
​ यवतमाळ जिल्ह्यात सेना नेत्यांचा वाद उघड


यवतमाळ जिल्हा शिवसेनाप्रमुख या पदावर पराग पिंगळे यांची नियुक्ती मातोश्रीवरून झाल्याच्या काही तासातच त्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. या माध्यमातून खासदार भावना गवळी आणि महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यातील वाद उघड झाला आहे.

मातोश्रीवरून आलेला आदेश व संजय राठोड यांनी घेतलेल्या निर्णयाला यवतमाळ जिल्हा शिवसेनेत पर्याय नसल्याचे सांगण्यात येते. मात्र या घटनेच्यानिमित्ताने त्याला तडा गेला आहे. यवतमाळ जिल्हा प्रमुखपदावर असलेल्या संतोष ढवळे यांना बदलण्याची चर्चा गेले काही दिवस सेनेत सुरू होती. शहरप्रमुख असलेल्या पराग पिंगळे यांना जिल्हाप्रमुख करण्याची इच्छा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांची होती. त्यांनी जिल्हाप्रमुखपदासाठी पराग पिंगळे यांच्या नावाची शिफारस मातोश्रीवर केली. राठोड यांची शिफारस असल्याने पराग पिंगळे यांचे नाव थेट मातोश्रीवरून जिल्हाप्रमुख म्हणून जाहीर झाले. त्यांच्या अध्यक्षतेखाली यवतमाळ शहरात बँकांसमोर ‘ढोल बजाओ’ आंदोलनही झाले. इकडे ढोल बडवित असतानाच त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाला स्थगिती देण्याचा निर्णय मातोश्रीवर घेण्यात आला.

पराग पिंगळे यांच्या नियुक्तीने संतप्त झालेल्या खासदार भावना गवळी यांनी त्यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळवूनच मातोश्री सोडले. जिल्हा प्रमुखपदासाठी पराग पिंगळे यांची नियुक्ती करताना संजय राठोड यांनी त्यांना विश्वासात न घेतल्याने भावना गवळी संतप्त झाल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत. संजय राठोड वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यावर त्या जिल्ह्यातील शिवसेनेत त्यांचा हस्तक्षेप वाढल्याने गवळी काही महिन्यांपासून अस्वस्थ होत्या. गवळी यांच्या विरोधक समजल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील सेनेच्या काही नेत्यांना संजय राठोड यांनी जवळ करणे गवळी यांना खटकले होते. शेवटी पराग पिंगळे यांच्या निमित्ताने त्यांना संधी मिळाली व त्यांनी प्रथमच संजय राठोड यांच्याविरोधात मातोश्रीवर आवाज उठविला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज