अ‍ॅपशहर

चोरीच्या पेट्रोलचा पोलिसांकडून पर्दाफाश

पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान लाखो रुपयांच्या पेट्रोल आणि डिझेल चोरीचा पर्दाफाश करण्यात आला. चोरीच्या व्यवसायाची चेन बरीच मोठी असून यात कोट्यवधीची उलाढाल असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी नऊजणांना ताब्यात घेतले आहे.

Maharashtra Times 25 Feb 2018, 1:00 pm
नागपूर : पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान लाखो रुपयांच्या पेट्रोल आणि डिझेल चोरीचा पर्दाफाश करण्यात आला. चोरीच्या व्यवसायाची चेन बरीच मोठी असून यात कोट्यवधीची उलाढाल असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी नऊजणांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम stolen petrol police busted
चोरीच्या पेट्रोलचा पोलिसांकडून पर्दाफाश


शहरातील झोन क्रमांक चारचे पोलिस उपायुक्त नीलेश भरणे आणि त्यांच्या पथकाने केलेल्या कारवाई दरम्यानचोरीने खरेदी केलेले पेट्रोल, डिझेल, फर्नेस ऑइल आणि लोखंडाचा बराच मोठा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरबी परिसरातील फोनलेन ढाबा येथे ही कारवाई करण्यात आले. यावेळी काही टँकर्सवर कारवाई करण्यात आली. यात नऊजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात ४० ते ५० आरोपींचा समावेश असून हा व्यवसाय कोट्यावधींचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हे आरोपी चोरीचे पेट्रोल, डिझेल, फर्नेस ऑईल आणि लोखंडाचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. हे आंतरराज्यीय रॅकेट आहे का याचाही पोलिस शोध घेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज