नागपूर : आई रागावल्याने अठरावर्षीय विद्यार्थिनीने विष घेऊन आत्महत्या केली. सुप्रिया खेमराज सहारे (रा. रामगड, अनाजबाजार, कामठी) असे मृतकाचे नाव आहे. ती अकरावीत शिकत होती. ती सतत मोबाइलवर राहात होती. तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. १६ डिसेंबरला आईने याबाबत तिला रागावले. सुप्रियाने विष घेतले. नातेवाइकांनी तिला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नवीन कामठी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
आई रागावल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या
आई रागावल्याने अठरावर्षीय विद्यार्थिनीने विष घेऊन आत्महत्या केली सुप्रिया खेमराज सहारे (रा रामगड, अनाजबाजार, कामठी) असे मृतकाचे नाव आहे...
30 21 Dec 2018, 4:00 am